How to upload Tiranga Selfie: भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. hargarhtiranga.com या वेबसाइटवर तिरंग्यासह फोटो अपलोड करण्यास सांगितले आहे. तुम्ही सर्वजण तुमचा सेल्फी या वेबसाइटवर अपलोड करू शकता. याबाबत पीएम मोदींनी एक ट्विटही केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या “हर घर तिरंगा” आंदोलनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
हर घर तिरंगा माहिम हा २०२२ साली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. मंत्रालयाने एक वेबसाइट देखील सुरू केली जी लोकांना त्यांचे सेल्फी अपलोड करण्यास अनुमती देते. वेबसाइटवर आतापर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे सेल्फी अपलोड केले आहेत.
(हे ही वाचा : Tech Tips: तुमच्या मोबाइलची बॅटरी कशी सेव्ह करायची? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स )
तुमचा सेल्फी कसा अपलोड कराल?
- सर्व प्रथम harghartiranga.com वर जा.
- येथे तुम्हाला होमपेजवर अपलोड सेल्फी विथ फ्लॅगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता एक पॉपअप तुम्हाला दाखवेल. त्यावर तुमचे नाव लिहा आणि सेल्फी अपलोड करा.
टीप, सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला ‘hargartiranga.com’ वेबसाइटवर तुमचे नाव आणि फोटो वापरण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमचा सेल्फी सबमिट करू शकाल. सेल्फी सबमिट केल्यानंतर, नावाच्या मदतीने तुम्ही तुमचा सेल्फी वेबसाइटवर देखील शोधू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला सेल्फी दिसत नसेल तर तुम्हाला तो १६ ऑगस्टनंतर पाहता येणार आहे.