PM Modi: देशात सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोज लोकांचे बँक अकाऊंट आणि वैयक्तिक माहिती वापरून सायबार गुन्हेगार अकाऊंट हॅक करतात. दररोज नवीन नवीन पद्धतीने सायबर गुन्हे करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आहे. आपली एका चुकीमुळे आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकतो. पण काही गोष्टींची काळझी घेतल्यास आपण त्यापासून तुमची वाचू शकता.
पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिला सल्ला
पंतप्रधान मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल आणि त्यांनी सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावर कशी चर्चा केली याबद्दल अधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर कॅबिनेट सचिवांनी सर्व मंत्रालयांना लेखी सूचना दिल्या आहेत. अहवालानुसार, ‘मंत्रालयांना त्यांच्या आयटी प्रणाली सुलभ करण्यासाठी आणि सायबर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलचे प्रामाणिक पालन सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच एका बैठकीत मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची सायबर सुरक्षेबद्दल टिप्स सांगितल्या. न्यूज 1१८ च्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिवसाच्या शेवटी त्यांच्या सिस्टममधून लॉग ऑफ केले आहे का? हे तपासा कारण मी हे नेहमी करतो. सायबर सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे” .
पीएम मोदींनी अधिकाऱ्यांना असेही सांगितले आहे की, प्रत्येक कार्यालयातील एका व्यक्तीला दिवसाच्या शेवटी फिरण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते आणि सर्व सिस्टम लॉग आउट झाल्याची खात्री केली जाऊ शकते. पंतप्रधान म्हणाले की,”ते स्वत: या टीपचे पालन करतात. घरी गेल्यावर त्याच्या सिस्टममधून लॉग आउट झाले आहे याची खात्री करतात आणि सिस्टीम लॉग इन ठेवणे धोकादायक ठरू शकते हे अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवले.
हेही वाचा – आता शोधाशोध करण्याची गरज नाही; व्हॉट्सॲप आणतयं Context Card; कोणी ग्रुपमध्ये का ॲड केलं हे मिनिटांत कळणार
सायबर सुरक्षा हा सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय आहे
गेल्या काही वर्षांत सरकारी यंत्रणांवर अनेक सायबर हल्ल्यांनंतर सायबर सुरक्षा हा सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये भारतातील आघाडीच्या हॉस्पिटल एम्सवर मोठा सायबर हल्ला झाला. खाजगीकरणापूर्वी, एअर इंडियाला २०२१ च्या सुरुवातीस मोठ्या हॅकिंग हल्ल्याचा सामना करावा लागला, ज्यामध्ये त्याच्या लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाला.
एका वर्षात २७ लाख तक्रारी नोंदवल्या
या वर्षाच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की,”सरकारच्या वाढत्या सतर्कतेमुळे भारतात सायबर फसवणूक होत आहे आणि गेल्या वर्षी देशात सायबर फसवणुकीशी संबंधित सुमारे २७ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. भारतात सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढलेली नाहीत, पण ‘फसवणूक आता शोधली जात आहे. आम्ही टोल फ्री क्रमांकही दिला आहे. त्यामुळेच त्यावर प्रकाश टाकला जात आहे. अशा तक्रारींचे यशस्वी निराकरण झाल्यामुळे लोक त्या नंबरवर कॉल करत असल्याचे त्यांनी सांगितले.