पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जुलै म्हणजेच मंगळवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेला संबोधित करताना AI आधारित ‘Bhashini’ प्लॅटफॉर्म सादर केला. भाषिणी हे भारताने विकसित केलेले AI वर आधारित असे भाषेचे अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक कंपन्यांनी आपले AI चॅटबॉट देखील लॉन्च केले आहेत.
रशियाचे व्लादिमीर पुतिन, चीनचे शी जिनपिंग, इराणचे इब्राहिम रायसी आणि पाकिस्तानचे शेहबाज शरीफ या राष्ट्रप्रमुखांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”भारताचे AI आधारित ‘भाषिणी’ प्लॅटफॉर्म SCO मधील भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही डिजिटल टेक्नॉलॉजी सर्वसमावेशक वाढीचे उदाहरण बनू शकते.” याबाबतचे वृत्त moneycontrol ने दिले आहे.
भाषिणी टूल मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये लॉन्च करण्यात आले. AI आधारित भाषिणी टूल अभियानाचे उद्दिष्ट विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करणे हे आहे. भारतीय MSMEs, स्टार्टअप्स आणि वैयक्तिक इन्होवेटर्सच्या वापरासाठी हे सरकारी पोर्टल AI आणि Natural Language Processing (NLP) सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
डिजिटल इंडिया कार्पोरेशन (DIC) अंतर्गत एक स्वतंत्र व्यवसाय विभाग (IBD), डिजिटल इंडिया भाषिणी विभाग (DIBD) ची स्थापना मिशन भाषिणी उपक्रमांना गती देण्यासाठी आणि भाषा टेक्नॉलॉजी तसेच विशेषतः स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे. भाषिणी प्लॅटफॉर्मवर आता एक हजारांपेक्षा जास्त पूर्व प्रशिक्षित AI मॉडेल्सचा अॅक्सेस आहे. हे AI आधारित भाषा मॉडेल ओपन भाषिणी API द्वारे भाषिणी इकोसिस्टिम भागीदारांसाठी देखील उपलब्ध आहेत. या App च्या मदतीने कोणीही व्यक्ती लाईव्ह भाषणाचे अनेक स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करू शकतो.
AI आधारित भाषिणी उपक्रम
भाषिणीच्या इकोसिस्टीममध्ये केंद्र आणि राज्य सरकारे, संशोधन आणि शैक्षणिक गट, उद्योग, स्टार्टअप्स, प्रकाशक, डेटा संग्रहित करणारे, क्युरेशन कंपन्या तसेच भाषा मिशन आणि व्यक्तींचा समावेश आहे. भाषिणी वापरण्यासाठी सोपे प्लॅटफॉर्म आहे. जिथे कोणीही स्थानिक भाषेचे इंग्रजीमध्ये आणि इतर कोणत्याही भाषेत भाषांतर करू शकतो. वेबसाईटवर भाषांतर नावाचा एक विभाग आहे. फक्त एका बॉक्समध्ये टाईप केल्यावर जी भाषा निवडण्यात आली आहे त्या भाषेत भाषांतर झालेले दिसेल.