Poco ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. नुकतेच पोको कंपनीने परवडणारे ४जी स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी Bharti Airtel सह भागीदारी केली आहे. कंपनीच्या मते, Poco C51 ४जी एअरटेल प्रीपेड कनेक्शनसह लॉक होईल. हा फोन ग्राहक १८ जुलैपासून खरेदी करू शकतात.

एका विशिष्ट किंमतीसह हे डिव्हाइस खरेदी करणाऱ्या सर्व एअरटेल प्रीपेड ग्राहकांना एअरटेलकडून एक वेळचा ५० जीबी मोबाइल डेटा मिळेल. या ऑफरचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गैर-एअरटेल ग्राहकांना जर का हा लाभ मिळवायचा असेल तर Activation साठी एअरटेलद्वारे डोअरस्टेप सिम कार्डचा फायदा घेऊ शकतात. याबबातचे वृत्त zeebiz ने दिले आहे.

Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
uber shikara
‘Uber’ने आता बोटसुद्धा बुक करता येणार; उबरने सुरू केलेली नवीन सेवा काय आहे?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

हेही वाचा : boAt चे संस्थापक अमन गुप्ता यांनी फ्रान्स दौऱ्याबाबत केले विधान; म्हणाले, “आता माझ्यासारख्या…”

पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन या भागीदारीबाबत आपले म्हणणे व्यक्त केले. ते म्हणाले, ”आम्हाला पोको आणि एअरटेलमध्ये झालेल्या भागीदारीमुळे आनंद होत आहे. ज्यामुळे देशभरात पोको C51 ची ओळख आणि क्षमता स्पष्ट होईल. आम्ही पोकोच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा फायदा प्रेक्षकांपर्यंत पोहचवू.”

Poco C51 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G36 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच डिव्हाइसमध्ये ७ जीबीची टर्बो रॅम मिळते. अनेक Apps मध्ये वेगाने चालविण्यासाठी आणि स्विच करण्यासाठी हे पुरेसे असू शकते. या पोकोच्या फोनमध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले आणि लेदरच्या डिझाईन देखील येते. पोको C51 4G हा स्मार्टफोन एका व्हेरिएंटमध्येच उपलब्ध आहे. म्हणजे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ५,९९९ रुपये आहे.

हेही वाचा : VIDEO: २१ जुलैपासून सुरू होणार Nothing कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोनचा सेल; मिळणार तीन हजारांचा डिस्काउंट

पोको आणि एअरटेल मधील ही भागीदारी पूर्ण भारतामध्ये उच्च-गुणवत्तेच्या परवडणारे स्मार्टफोनची ओळख वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते. त्याच्या फीचर्ससह आकर्षक किंमती आणि एअरटेलच्या सेवांचे अतिरिक्त फायदे Poco C51 स्मार्टफोन बाजारात चांगली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे.हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नवीन व्हर्जनवर चालतो. म्हणजेच अँड्रॉइड 13 Go – क्लीन UIवर हा फोन चालतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना दोन वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात.

Story img Loader