Poco कंपनीने आपला एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत असते. यावेळी कंपनीने Poco M6 Pro हा फोन सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच याला Snapdragon 4 Gen 2 SoC चे सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स कंपनीने दिले आहेत आणि याचा कॅमेरा, बॅटरी व किंमत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तसेच हा विक्रीसाठी कधीपासून उपलब्ध होणार हे देखील पाहुयात.
Poco M6 Pro 5G: स्पेसिफिकेशन्स
शाओमी सब ब्रँड असलेल्या कंपनीने या ५ जी स्मार्टफोनला ६.७९ इंचाच्या FHD + डिस्प्लेसह लॉन्च केले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz आहे. याच्या संरक्षणासाठी फोनमध्ये गोरिला ग्लास ३ लेयर मिळते. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC ने सुसज्ज आहे. हा अँड्रॉइड १३ आधारित MIUI 14 आउट-ऑफ-द-बॉक्स चालतो आणि ३ वर्षांच्या सेफ्टी अपडेटसह २ प्रमुख OS अपडेटचे वचन देते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
पोकोच्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा AI सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हीडोसाठी यात ८मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला ५००० mAh क्षमतेच्या बॅटरीसह १८ W चार्जिंग सपोर्ट मिळतो. यूएसबी टाइप-सी केबलद्वारे याचे चार्जिंग होते. Poco M6 Pro 5G वर साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
किंमत
Poco M6 Pro 5G हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. ४/६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तर ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याची विक्री भारतात केवळ फ्लिपकार्टवर होणार आहे.