पोको ही स्मार्टफोन तयार करणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीद्वारे उत्तमोत्तम विद्युत उपकरणांचे उत्पादन केले जाते. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स सादर करत असते. जर का तुम्ही तुमच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर,उद्या पोको कंपनी बजेटमधील स्मार्टफोन सादर करणार आहे. पोको उद्या Poco C51 स्मार्टफोन सादर करणार आहे. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

Poco C51 चे फीचर्स

Poco C5 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz सपोर्ट करतो. या फोनमध्ये ४ जीबी रॅम मिळणार आहे. ती तुम्हाला ७ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. यामध्ये तुम्हाला MediaTek Helio G36 प्रोसेसर मिळतो. तसेच ५००० mAh ची बॅटरी आणि १०W चे चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला ८ मेगापिक्सल ड्युअल AI कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला पोको तुम्हाला २ वर्षांसाठी सेफ्टी अपडेट देईल.

काय असणार किंमत ?

पोको उद्या जो फोन लॉन्च करणार आहे त्या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला थोडे थांबावे लागणार आहे. हा फोन लॉन्च झाल्या नंतर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Story img Loader