Poco ही अत्यंत लोकप्रिय मोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. असाच एक तगडा स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे. पोको कंपनीने आपला मिड रेंज बजेटमधील Poco F5 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनला गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या या फोनबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात.
Poco F5 5G चे फीचर्स
Poco F5 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्युअल सिम सपोर्ट मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. डिस्प्ले DCI-P3 कलर गॅमट, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्टसह 100 टक्के कव्हरेजसह येतो. स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण देखील देण्यात आले आहे.
पोकोचा नवीन फोन लकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसरसह येतो. यामध्ये ८ जीबीची LPDDR5X रॅम देण्यात आली आहे. ७ जीबी वर्च्युअल रॅमसह RAM १९ जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये २५६ जीबीचे UFS 3.1 स्टोरेज मिळते. या फोनमध्ये चेंबर कूलिंग सिस्टीम देखील मिळते. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कँमेरा मिळतो. तर १०८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि तिसरा हा २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरासेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Poco F5 5G मध्ये ६७ W चे टर्बो चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच याला ५००० mAh ची बॅटरी मिळते. हा फोन केवळ ४५ मिनिटांमध्ये ० ते १०० टक्के इतका चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3 आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळतात। सेफ्टीसाठी माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहेत.
Poco F5 5G ची किंमत
Poco F5 5G हा स्मार्टफोन Charcoal Black, Electric Blue आणि Snow Storm White या रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत ही २९,९९९ रुपये इतकी आहे. तर २५६/१२ जीबी स्टोरेज व रॅम असणाऱ्या फोनची किंमत ही ३३,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन १६ मे पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.