Poco ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेट असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आतासुद्धा लवकरच कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे नाव Poco F5 असे आहे. तर याफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत. त्याशिवाय हा फोन कधी लॉन्च होणार आहे तेही जाणून घेणार आहोत.

Poco F5 चे फीचर्स

पोकोचा Poco F5 हा अपकमिंग फोन रेडमी नोट १२ टर्बोचे री-ब्रँडेड व्हर्जन असेल. हा फोन ज्या दिवशी भारतामध्ये लॉन्च होणार आहे त्याच दिवशी त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला रिअर पॅनेलमध्ये तीन कॅमेरे मिळतील ज्यामध्ये LED फ्लॅश लाईट देखील मिळेल. Poco F4 हा फोन मागील वर्षी भारतात लॉन्च करण्यात आला होता. अपकमिंग फोन या फोनचेच अपग्रेड व्हर्जन असणार आहे.

Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर
IMEI Number for mobile phone
चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी IMEI नंबर आहे महत्त्वाचा, कसा मिळवाल ‘हा’ क्रमांक? जाणून घ्या
Centres Notice to Ola, Uber : iPhone आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यासांठी आकारलं जातंय वेगवेगळं भाडं? ओला, उबर कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
sambhav
भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत? जाणून घ्या…

हेही वाचा: सारखा सारखा रिचार्ज करायचा त्रास आता वाचणार! Vodafone-Idea ने लॉन्च केला १८० दिवसांची वैधता असणारा ‘हा’ प्लॅन

पोकोच्या या फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन मिळणार आहे. तसेच फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. तसेच अन्य २ लेन्स या ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि तिसरा कॅमेरा हा २ मेगापिक्सलचा असण्याची शक्यता आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.Poco F5च्या लॉन्चिंग आधीच कंपनी हे स्पष्ट केले आहे, हा फोन Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने या फोनचा एक टिझर देखील ट्विटरवर शेअर केला आहे. हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच यामध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी OLED डिस्प्ले मिळणार आहे.

हेही वाचा: Vivo X90 Series: विवोने लॉन्च केले ‘हे’ दोन जबरदस्त स्मार्टफोन; ५० MP कॅमेरासह मिळणार…

काय असू शकते किंमत ?

Poco F5 या स्मार्टफोनची किंमत ३०,००० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या फोनची स्पर्धा वनप्लसच्या अपकमिंग फोन OnePlus Nord 3 शी असणार आहे. हा स्मार्टफोन ९ मे २०२३ रोजी भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे. तसेच याच दिवशी तो जागतिक बाजारपेठेमध्ये देखील लॉन्च केला जाणार आहे.

Story img Loader