Poco Launched Budget Friendly Smartphone In India : स्मार्टफोन खरेदी करताना स्टोरेज, कॅमेरा यांसह अनेक फीचर्स तपासून पाहिली जातात. पण, स्मार्टफोम थोडा स्वस्त म्हणजेच आपल्या बजेटमध्ये असावा, अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. तर तुमची ही इच्छा शाओमी (Xiaomi)ची सब-ब्रॅण्ड पोको कंपनी पूर्ण करील. कारण- १७ डिसेंबर रोजी भारतातला सर्वांत कमी किमतीचा ५जी स्मार्टफोन लाँच झाला आहे. तर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
शाओमी (Xiaomi) च्या सब-ब्रॅण्ड पोकोने (Poco) भारतात दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यामध्ये पोको सी७५ (Poco C75) व पोको एम७ प्रो (Poco M7 Pro)चा समावेश आहे. पोको एम७ प्रो हा पोकोच्या एम (M) सीरिजचा भाग आहे. त्यात हाय ब्राइटनेस आणि डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह ड्युअल स्पीकरचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोको सी७५ हा पोकोच्या सी (C) सीरिजचा भाग आहे आणि Snapdragon 4s Gen 2 चिपसेट, ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
हेही वाचा…वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार! स्लिम डिझाइन, शानदार कॅमेरा लेआउटसह OnePlus 13 भारतात होणार लाँच
पोको सी७५ आणि पोको एम७ प्रो किंमत –
पोको एम७ प्रो ६ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे; तर ८ जीबी प्लस २५६ जीबी सह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर २० डिसेंबरपासून दुपारी १२ वाजता उपलब्ध होईल. तर पोको सी७५ ची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे सिंगल ४ प्लस ६४ जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवर १९ डिसेंबर म्हणजे आजपासून रात्री १२ वाजता उपलब्ध झाला आहे.
पोको सी७५ आणि पोको एम७ प्रो स्पेसिफिकेशन –
पोको एम७ प्रोमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले, २,१०० nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ द्वारे प्रोटेक्टड आहे. हे मीडिया टेक डायमेन्सिटी ७०२५ अल्ट्रा चिपसेट, ८ जीबी पर्यंत रॅम, २५६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिव्हाइस ॲण्ड्रॉइड १४ बेस HyperOS वर चालते आणि त्याला दोन वर्षे ॲण्ड्रॉइड अपडेट, चार वर्षांची सिक्युरिटी अपडेट देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये ५,११० बॅटरी आहे, जी ४५ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा सिस्टीममध्ये ५० एमपी मेन सेन्सर आणि २ एमपी मायक्रो लेन्सचा समावेश आहे आणि फ्रंट कॅमेरा २० एमपी रिझोल्युशन आहे.
पोको सी७५ मध्ये ६.८८ इंचांच्या डिस्प्लेसह १६४० × ७२० पिक्सेल रिझोल्युशन, ६०० नीट्स ब्राइटनेस फीचर्स, स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ प्रोसेसर देण्यात आला आहे. ४ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेजचा पर्याय आहे. त्याचप्रमाणे हा डिव्हाइससुद्धा ॲण्ड्रॉइड १४ बेस HyperOS वर चालतो आणि त्याला दोन वर्षे ॲण्ड्रॉइड अपडेट, चार वर्षांची सिक्युरिटी अपडेट देण्यात आली आहे. डिव्हाइसमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी आहे आणि ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये ५० एमपी मेन कॅमेरा व १.८ एमपी QVGA सेकंडरी कॅमेरा, सेल्फीसाठी ५ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.