Xiaomi सब-ब्रॅण्ड पोको (POCO) कंपनीने काही वर्षांत भारतात आपले नाव कोरले आहे. तर कंपनीने अखेर भारतीय बाजारपेठेत ‘पोको एम५ ५-जी’ स्मार्टफोन (POCO M5 5G) लाँच केला आहे. हा एक बजेट फ्रेंडली फोन असून, तो ९,४९९ रुपये किमतीत उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन MediaTek चिपसेटद्वारे समर्थित आहे; जो ६.४७ -इंचाचा डिस्प्ले सपोर्ट करतो. हे एमआययूआय १ सह (MIUI 1) ॲण्ड्रॉईड १३ ( Android 13) वर चालते आणि ५० एमपी एआय (50MP AI) ड्युअल रीअर कॅमेरा आणि ५एमपी (5MP) फ्रंट शूटरसह येतो. पोकोने सादर केलेल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनचे फीचर जाणून घेऊ.
पोको एम५ फायजी या स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर २६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्री सुरू होईल. हा फोन तीन स्टोअरेज प्रकारांमध्ये सादर केला जाईल. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज व्हेरियंटची किंमत ९,४९९ रुपये अशी आहे. तसेच ६ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत १०,४९९ रुपये आणि ८ जीबी प्लस २५६ जीबी (8GB+256GB) व्हेरिएंट असलेला फोन १२,४९९ रुपयांमध्ये निळा, काळा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. विशेष लाँच ऑफर म्हणून ग्राहकांना आयसीआयसीआय (ICICI) डेबिट, क्रेडिट कार्ड्स, ईएमआय (EMI) व्यवहारांसह एक हजार रुपयांची सवलत किंवा उत्पादन एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात येईल. त्याव्यतिरिक्त एअरटेल प्रीपेड वापरकर्त्यांना ५०जीबी (50GB) अतिरिक्त डेटाची विशेष ऑफर मिळेल.
पोको एम५ ५-जी हा फोन जलद डेटा प्रोसेसिंगचा अनुभव देतो; जो उल्लेखनीय 428K+ AnTuTu स्कोअर, १६जीबी (16GB)पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोअरेजद्वारे प्रदर्शित केला जातो. एमआययूआय १४ (MIUI 14)सह ॲण्ड्रॉईड १३ वर चालणारे डिव्हाइस तीन वर्षांच्या सुरक्षा पॅचचे वचन देते. तसेच हा मोबाईल ‘कॉर्निंग गोरिल्ला’ ग्लासने सुसज्ज आहे आणि त्यात स्प्लॅश आणि धुळीपासून संरक्षण करण्याचे फीचर आहे. बाजूला ‘फास्ट साइड फिंगरप्रिंट सेन्सर’ फोन अनलॉक करण्यासाठी डिझाईन केला आहे. फोनमध्ये फ्लिकर-फ्री ६.७५ इंचाचा डिस्प्ले आहे. त्यात कमाल रिफ्रेश दर 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. तसेच 8W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह हे डिव्हाइस येते.
पोको एम५ ५-जीच्या लाँचबद्दल बोलताना, Poco India चे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, “कंपनीने या वर्षी 5G सेगमेंटमध्ये लक्षणीय प्रभाव पाडला आहे. आमच्या M सीरीज पोर्टफोलिओमध्ये पोको एम५ फायजी जोडत आहे; जो भारतातील सर्वांत परवडणारा 5G स्मार्टफोन बनला आहे. आता पोको एम५ ५-जी सादर करून, आम्ही हा वारसा पुढे नेण्यासाठी आणि 5G तंत्रज्ञान सुलभ बनवण्याचे आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. . आम्हाला विश्वास आहे की, प्रत्येक ग्राहकाला 5G चा हा खास फोन वापरण्याची संधी मिळायला हवी.”