आजकाल स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. आपली बरीचशी कामे स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण होतात. डिजिटल पेमेंट करणे असेल, वीजबिल भरणे असेल किंवा अन्य कामांचा समावेश यामध्ये होतो. देशामध्ये अनेक कंपन्या आपापले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत ज्यात नवनवीन फीचर्सचा समावेश आहे. आज आपण सॅमसंग Galaxy F34 5G आणि पोको M6 Pro या दोन फोन्सबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच यांच्यातील फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्समधील तुलना जाणून घेऊयात.

Samsung Galaxy F34 5G : स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलॅक्सी F34 5G मध्ये वापरकर्त्यांना ६.४६ इंचाचा S-AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच यात कम्पनी १०० नीट्स पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. तसेच हा फोन Exynos 1280 SoC द्वारे समर्थित आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज ऑफर करण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित One UI 5.1 वर चालतो.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

हेही वाचा : २० हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये लॉन्च झाला Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन, मिळणार इन्स्टंट डिस्काउंट

Poco M6 Pro 5G: स्पेसिफिकेशन्स

शाओमी सब ब्रँड असलेल्या कंपनीने या ५ जी स्मार्टफोनला ६.७९ इंचाच्या FHD + डिस्प्लेसह लॉन्च केले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz आहे. याच्या संरक्षणासाठी फोनमध्ये गोरिला ग्लास ३ लेयर मिळते. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC ने सुसज्ज आहे. हा अँड्रॉइड १३ आधारित MIUI 14 आउट-ऑफ-द-बॉक्स चालतो आणि ३ वर्षांच्या सेफ्टी अपडेटसह २ प्रमुख OS अपडेटचे वचन देते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

Samsung Galaxy F34 5G : कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये वापरकर्त्यांना ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. रिअर कॅमेरा हा फीचरसह येतो. ज्यामुळे वापरकर्त्यांना एका शॉटमध्ये ४ व्हिडीओ आणि ४ फोटो कॅप्चर करता येतात. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

Poco M6 Pro 5G: कॅमेरा

पोकोच्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा AI सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हीडोसाठी यात ८मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला ५००० mAh क्षमतेच्या बॅटरीसह १८ W चार्जिंग सपोर्ट मिळतो. यूएसबी टाइप-सी केबलद्वारे याचे चार्जिंग होते. Poco M6 Pro 5G वर साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

हेही वाचा : VIDEO: Poco कंपनीचा ५० मेगापिक्सलचा कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत फक्त…

Samsung Galaxy F34 5G: किंमत, ऑफर्स

सॅमसंग Galaxy F34 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये तर ८/१२८ व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही इलेक्ट्रिक ब्लॅक आणि मिस्टिक ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्ट, अधिकृत सॅमसंग वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. सॅमसंग Galaxy F34 5G ११ ऑगस्ट पासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Poco M6 Pro 5G : किंमत

Poco M6 Pro 5G हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. ४/६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तर ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याची विक्री भारतात केवळ फ्लिपकार्टवर होणार आहे.