Poco X4 5G लवकरच भारतात लॉंच होणार आहे. या 5G स्मार्टफोनबद्दल बोललं जात आहे की, हा १०८ MP कॅमेरा फोन घेऊन येईल. भारतीय व्हेरिएंटचा हा फोन गीकबेंचवर स्पॉट झाला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 SoC द्वारे समर्थित आहे, ६ GB RAM देखील मिळतोय. फोन आधीच इतर अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याचा मॉडेल नंबर Xiaomi 2201116PI गीकबेंच लिस्टिंगमध्ये देण्यात आला आहे. तो लवकरच त्याच मॉडेल नंबरसह भारतात येऊ शकतो. लिस्टिंगमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये सिंगल-कोर टेस्टमध्ये ६८८ आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये २,०५२ पॉइंट मिळाले आहेत. हे Qualcomm Snapdragon 695 SoC द्वारे समर्थित असू शकते.

हा Poco फोन रिब्रँडेड Redmi Note 11 Pro 5G सारखा असण्याची शक्यता आहे. यापूर्वी Poco ने Redmi Note 11 ची चीनी वर्जन Poco M4 Pro 5G म्हणून जागतिक स्तरावर रिलीज केली आहे.

आणखी वाचा : Tecno Pova 5G स्मार्टफोनची लॉंचींग डेट कन्फर्म! जाणून घ्या किंमत

Redmi Note 11 Pro चे रीब्रॅंडेड वर्जन
शिवाय, पूर्वीच्या अहवालात असे सुचवण्यात आले होते की, Poco X4 5G ही Redmi Note 11 Pro 5G चे रीब्रॅंडेड वर्जन असू शकते. फोनने अलीकडेच ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह जागतिक पदार्पण केले आहे. हे तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये ६ GB + ६४ GB, ६GB + १२८ GB आणि ८ GB + १२८ GB मध्ये सादर केले गेले आहे.

आणखी वाचा : ‘या’ तारखेला लॉंच होऊ शकतो iPhone SE 3, Ipad Air चे डिटेल्स आले समोर, iPhone 11 केवळ ३१,०० रुपयांना

पोको X4 5G चे स्पेसिफिकेशन
कंपनी १२० Hz च्या रीफ्रेश रेट आणि १२०० nits च्या पीक ब्राइटनेससह ६.६७ इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले देऊ शकते. यासोबतच हा फोन ६ GB रॅम आणि ८ GB रॅम देऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये १०८ MP प्रायमरी लेन्ससह ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड स्नॅपर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश असू शकतो. यासोबतच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. तसेच ५००० mAh बॅटरी आणि ६७ W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.