Poco X5 Pro: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदीच्या विचारत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण, Poco आपला नवीन स्मार्टफोन ‘Poco X5 Pro’ या लवकरच लाँच करणार आहे. अलीकडेच, Poco प्रमुख हिमांशू टंडन यांनी Poco X5 मालिका जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान लाँच होऊ शकते, असे संकेत दिले होते. आता कंपनी या महिन्याच्या अखेरीस या हँडसेटचे अनावरण करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Poco X5 Pro चे स्पेसिफिकेशन्स:संभाव्य

Poco X5 सीरीजचे फोन आधीच अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर पाहिले गेले आहेत. मागील आठवड्यात चीनमध्ये डेब्यू झालेल्या Redmi Note 12 स्पीड एडिशन सारख्याच वैशिष्ट्यांसह हा स्मार्टफोन येण्याची माहिती आहे. हे Poco X5 Pro म्हणून भारतात येऊ शकते.

हे ही वाचा << …म्हणून नवीन वर्षात वापरता येणार नाही 5G सेवा

Poco X5 Pro ६.६७-इंचाच्या FHD+ OLED डिस्प्ले पॅनेलसह येण्याची अफवा आहे. हे १२०Hz पर्यंत अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, १०८०×२४०० पिक्सेल रिझोल्यूशन आणि HDR10+ सपोर्ट देऊ शकते. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ७७8G प्रोसेसरने सुसज्ज असल्याचे सांगितले जात आहे. हे १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज क्षमतेसह जोडले जाऊ शकते.

Poco X5 Pro बॅटरी

आगामी Poco फोनमध्ये ५,,०००mAh बॅटरी असेल असे म्हटले जाते. हे ६७watt फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. समोरच्या बाजूला सेल्फीसाठी १६MP कॅमेरा देऊ शकतो. मागील कॅमेरा सेटअप १०८MP प्राथमिक सेन्सर देऊ शकतो. मुख्य कॅमेरा ८MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि २MP मॅक्रो सेन्सरसह जोडला जाऊ शकतो.

दरम्यान, Poco ने C सीरीजचा नवीन फोन लाँच केला आहे. कंपनीने भारतात परवडणाऱ्या Poco C50 ची घोषणा केली आहे. स्मार्टफोन HD+ रिझोल्यूशनसह ६.५२-इंच वॉटर-ड्रॉप नॉच पॅनेलसह येतो. स्क्रीन ६०Hz चा रीफ्रेश दर देते आणि १२०Hz चा टच सॅम्पलिंग दर आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस लेदरसारखे टेक्सचर डिझाइन आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poco x5 pro smartphone will be launched with a 5000 mah battery and 67w fast charging pdb