POCO X7 Pro 5G and POCO X7: भारतात बजेट फ्रेंडली आणि नवीन फिचर्ससह फोन आणण्यासाठी अनेक कंपन्यात स्पर्धा पाहण्यात मिळते. प्रिमियम फोनप्रमाणे फिचर्स आणि अवाक्यात असलेली किंमत यामुळे गेल्या काही काळात ‘पोको’ ब्रँडच्या फोनना चांगली प्रसिद्धी मिळत आहे. पोकोने नुकतीच फ्लॅगशिप एक्‍स७ सिरीजमध्ये पोको एक्‍स७ आणि पोको एक्‍स७ प्रो असे दोन फोन लाँच केले आहेत. पोकोचा ब्रँड अँबेसेडर अभिनेता अक्षय कुमारच्या उपस्थितीत जयपूर येथील सोहळ्यात दोन्ही फोन बाजारात आणल्याची घोषणा करण्यात आली.

Poco X7 5G चे फिचर्स

Poco X7 ची विक्री १७ जानेवारी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी हा फोन खरेदी केल्यास चांगला डिस्काऊंट मिळणार आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या बेस व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
Realme 14 Pro 5G Series Launch in India
नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क
Smart electricity meters , elections , mahavitaran ,
निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…

उत्तम परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० अल्‍ट्रा चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. तर सामान्य वापरासाठी दिवसभर पुरेल इतकी ५५०० एएमएच बॅटरी देण्यात आली आहे. ती ४५W जलदगतीने चार्जिंग होण्यास सपोर्ट करते. ‘कॉर्निंग गोरिला ग्‍लास व्हिक्‍टस २’चे प्रोटेक्शन मिळत असल्यामुळे फोन अचानक पडल्यास डॅमेज होण्यापासून संरक्षण मिळते. आयपी६६, आयपी६८ आणि आयपी६९ रेटिंग असल्यामुळे पाणी आणि धुळीपासूनही फोन सुरक्षित राहतो. ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटी-६०० प्रायमरी कॅमेरा प्राप्त झाल्यामुळे फोटो काढण्याचा उत्तम अनुभव यात मिळू शकतो.

Poco X7 Pro 5G चे फिचर्स

सर्वाधिक ६५५० एमएएचची आणि सिलिकॉन कार्बन टेक्‍नॉलॉजीसह या मॉडेलमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ९० वॅट हायपरचार्ज तंत्रज्ञान असल्यामुळे फक्‍त १९ मिनिटांमध्‍ये ० टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत फोन चार्ज होतो. एक्‍स७ प्रो मध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी ८४०० अल्‍ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंगसाठी हा प्रोसेसर उत्तम असल्याचा दावा कंनपीकडून करण्यात आला आहे. ६.६७-इंच एएमओएलईडी फ्लॅट डिस्‍प्‍ले देण्याता आला असून मागील फोनपेक्षा यात अनेक बदल करण्यात आले आहेत.

कॅमेऱ्यातही अनेक बदल केले असून ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटी-६०० कॅमेरासह AI तंत्रज्ञानही दिले गेले आहे.

चुटकीसरशी भाषांतर

एक्‍स७ प्रो हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित शाओमी हायपरओएस २.० असलेला पहिला फोन आहे. यात नेक्‍स्‍ट-जनरेशन ओएसमध्‍ये २९ भाषांचे एआय भाषांतर, एआय सबटायटल्‍स, एआय नोट्स आणि डायनॅमिक विजेट्स आहेत.

Story img Loader