Follow This Steps To Port Your SIM Into BSNL : खाजगी दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआयने (Vodafone Idea) जून महिन्याच्या अखेरीस प्रीपेड व पोस्टपेड दोन्ही युजर्सच्या सर्व मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली. त्यामुळे बरेच ग्राहक भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) वर त्यांचे सिम स्विच करण्याचा विचार करत आहेत. कारण – त्यांनी अद्याप कोणतीही दरवाढ लागू केलेली नाही. जर तुम्ही सुद्धा तुमचे सिम कनेक्शन BSNL वर पोर्ट करण्याचा विचार करत असल्यास ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त तीन स्टेप्सच्या मदतीने तुमचे सिम अगदी सहज स्विच करू शकता.
पायरी १: युनिक पोर्टिंग कोड (UPC) :
सगळ्यात पहिला मेसेज ॲप उघडा आणि PORT टाइप करा [ म्हणजे तुमचा १० अंकी मोबाइल नंबर] . हा संदेश १९०० वर पाठवा. तुम्हाला रिप्लाय म्हणून तुमच्या मोबाईलवर युनिक पोर्टिंग कोड (UPC) येईल. जर तुम्ही जम्मू व काश्मीरमधील प्रीपेड मोबाइल ग्राहक असाल तर तुम्हाला मजकूर संदेश पाठवण्याऐवजी १९०० वर कॉल करणे आवश्यक आहे.
युनिक पोर्टिंग कोड १५ दिवसांसाठी किंवा तुमचा नंबर दुसऱ्या ऑपरेटरकडे पोर्ट होईपर्यंत वैध असतो. पण, जम्मू, काश्मीर, आसाम आणि ईशान्येतील निवडक भागांमधील सदस्यांसाठी, युनिक पोर्टिंग कोड ३० दिवसांपर्यंत वैध आहे. पुढच्या पायरीकडे वळण्यापूर्वी तुमच्या सध्याच्या कंपनीकडे तुमची शिल्लक थकबाकी नसल्यास, तुमचा मोबाईल नंबर १५ ते ३० दिवसांत सुरू केला जाईल.
पायरी २: बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या :
तुमच्या मोबाईलवर युनिक पोर्टिंग कोड आला की, यानंतर तुम्ही ग्राहक सेवा केंद्राला (स्टोअर) वर जाऊन आपला नंबर पोर्ट करू शकता. आता स्टोरवर तुमचा नंबर पोर्ट करण्यासाठी आवश्यक डॉक्यूमेंट्स आणि खासगी माहिती द्यावी लागते, त्याची माहिती पुढीलप्रमाणे :
१. ग्राहक अर्ज फॉर्म (CAF) भरा.
२. एक पासपोर्ट फोटो, ॲड्रेस प्रूफ.
३. तुमच्या ऑपरेटरकडून प्राप्त झालेले युनिक पोर्टिंग कोड सबमिट करा.
४. सिम पोर्ट करण्यासाठी फी भरा. (जरी BSNL ने सांगितले आहे की ते सध्या पोर्टिंगसाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत).
पायरी ३: पोर्टिंग प्रक्रिया पूर्ण करा
आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक नवीन BSNL सिम कार्ड प्रदान केले जाईल. तुमचे जुने सिम कधी निष्क्रिय केले जाईल आणि नवीन BSNL सिम कधी सक्रिय होईल याची माहिती देणारा मेसेजही तुम्हाला ईयोल. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त तुमचे जुने सिम नवीन BSNL सिमने वेळीच बदलून घ्या.
अशाप्रकारे या सोप्या तीन स्टेप्सच्या मदतीने तुम्ही सिम पोर्ट करू शकता.
© IE Online Media Services (P) Ltd