Meta Layoffs: सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फायनान्शिअल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या वर्षी Facebook च्या मूळ Meta Platforms Inc. कंपनीने त्यांच्या अनेक टीम्सचे बजेट जाहीर केलेले नाही आहे. बजेट जाहीर न करण्याचे मुख्य कारण म्हणजे मेटा कंपनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार बजेट सादर न झाल्यामुळे आणि कमर्चाऱ्यांची कपात होण्याची शक्यता असल्याने मेटा कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मेटाने घोषणा केली आहे की २०२३ मधील खर्च $८९ बिलियन ते $९५ बिलियन मध्ये असण्याची अपेक्षा आहे. सीईओ मार्क झुकरबर्गने या कालावधीला म्हटले आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: गुगल मायक्रोसॉफ्टनंतर आता ‘ही’ टेक कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार!

या आधीही मेटाने केली होती कर्मचारी कपात

या आधीही मेटा कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये सुमारे ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. म्हणजेच कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. मेटा ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅप सारख्या कंपन्यांची मूळ कंपनी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of layoff to meta company not submitting budget of some teams tmb 01