सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. AI Chatbot गेल्या काही वर्षांपासून जगाची पहिली आवड झाली आहे. अनेक कंपन्या ग्राहक सेवेसाठी चॅटबॉट्सचा वापर करत आहेत, पण गेल्या काही महिन्यांत एआय चॅटबॉट्सचे जग बदलले आहे. ChatGPT ने सर्वांनाच वेड लावले आहे.

Google आणि मायक्रोसॉफ्ट चॅटजीपीटी सारख्या AI चॅटबॉटसाठी अनेक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. टेक कंपन्यांमध्ये AI सर्वात आघाडीवर आहे. त्यात चॅटजीपीटी आघाडीवर आहे. मात्र Google Search चे प्रमुख प्रभाकर राघवन चॅटजीपीटीच्या मोठ्या त्रुटींबद्दल व त्यातील तोटे याबद्दल लोकांना सावधान केले आहे.

Jio Ai Cloud Storage Welcome offer
Jio AI Cloud Welcome Offer : जिओ युजर्स तुम्हालाही हा एसएमएस आला आहे का? आता फोटो, व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी मिळणार 100GB फ्री स्टोरेज
DOJ will push Google to sell Chrome
गूगलला Chrome ब्राउझर विकावं लागणार ? अमेरिकन न्याय…
3 steps to take after receiving a scam call
Spam Call : आता स्पॅम कॉल, मेसेजपासून होणार सुटका; सोप्या तीन स्टेप्स फॉलो करून सेकंदांत करा तक्रार
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स

हेही वाचा : ChatGPT बाबत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचं मोठं विधान; म्हणाले, “हे जग …”

जर्मनीच्या Welt am Sonntag या वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राघवन यांनी चॅटबॉट्समधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांबद्दल भाष्य केले. त्यांनी AI मधील त्रुटींबद्दल इशारा दिला. ChatGPT सारखी AI टूल्स हे बनावट उत्तर देऊ शकते असे प्रभाकर राघवन म्हणाले.

ChatGpt हे बऱ्याच प्रमाणात इंग्रजीमध्ये अचूक उत्तरे देत आहे. परंतु हिंदीमध्ये येणारी उत्तरे ही नक्कीच भ्रमित करणारी आहेत. तुम्ही स्वतः हे वापरून पाहू शकता. अर्थात याच्याशी स्पर्धा करण्यासाठी टेक कंपनी Google ने देखील आपला चॅटबॉट Bard लॉन्च केला आहे. सर्व चाचण्या पूर्ण झाल्या की ते सर्वांच्या वापरासाठी लॉन्च करण्यात येणार आहे असे सुंदर पिचाई यांनी सांगितले.