Vivo ही एक चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. विवो कंपनी १ मार्च रोजी आपली Vivo V27 ही सिरीज लॉन्च करणार आहे. माहितीनुसार कंपनी या सिरीज अंतर्गत ३ स्मार्टफोन म्हणजेच Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e बाजरात लॉन्च करणार आहेत. हा लॉन्चिंग इव्हेंट तुम्ही कंपनीच्या you tube चॅनलवर पाहू शकणार आहात. मात्र असे सांगितले जात आहे की कंपनी १ मार्च रोजी फक्त Vivo V27 Pro लॉन्च करणार आहे जो या सिरींजमधील खास स्मार्टफोन असणार आहे. उर्वरित दोन फोन कंपनी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लॉन्च करू शकते. मात्र याबद्दल कोणीतही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे. मात्र लॉन्चिंग करण्यापूर्वीच Vivo V27 Pro ची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहेत.

Vivo V27 Pro चे फिचर्स

Vivo V27 Pro मध्ये ग्राहकांना 3D कर्व्ह डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये १२० hz इतका रिफ्रेश रेट असणार आहे. या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला Vivo च्या Vivo V23 आणि V25 सिरीजमध्ये असणारा कलर चेंजिंग बॅक पॅनल बघायला मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8200 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. वापरकर्त्यांना या मध्ये ४६००mAh ची बॅटरी आणि ६७ W चे फास्ट चार्जिंग मिळणार आहे.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

हेही वाचा : Tech Layoffs: Google ची नोकरी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याने मांडली व्यथा; म्हणाली, “माझ्या ६ वर्षाच्या मुलीला…”

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ५० मेगापिक्सल Sony imx776V च प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा सेटअप मिळणार आहे. आणि हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ सह लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo V27 Pro ची किंमत

Vivo V27 Pro यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८, २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज तसेच १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असे पर्याय उपलब्ध असू शकतात. 91 Arena च्या रिपोर्टनुसार, Vivo V27 Pro च्या बेस वेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये असू शकते. ८/२५६ या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ही ४२,९९९ रुपये इतकी असू शकते. कंपनीने या फोनच्या अधिकृत किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. मोबाईल फोन लॉन्च झाला कीच याच्या अधिकृत किंमती समोर येतील.

Story img Loader