Emergency Location Sharing Android : मोबाईल हा सर्वांचा आवडता मित्र झाला आहे. मनोरंजन, गेमिंग, मेसेजिंग इत्यादी करणांसाठी त्याचा रोज वापर केला जातो. ते गळ्यातलं ताइतच झाले आहे. घराबाहेर असल्यास कुटुंबाशी संपर्कात राहण्यास ते मदत करते. अडचणीत असताना तो कामात येऊ शकतो. तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. अँड्रॉइड आपल्या युजर्सना ‘इमरजेन्सी लोकेशनची’ सुविधा देते. अडचणीत असताना तुम्ही या Emergency location फीचरचा वापर करू शकता.
अँड्रॉइड युजर्स आपल्या स्मार्टफोनच्या लॉक स्क्रीनवर इमरजेन्सी संपर्क टाकू शकतात. स्मार्टफोनच्या पावर बटला प्रेस आणि होल्ड करून अडचणीच्या काळात इमरजेन्सी संपर्क क्रमांकाला सूचित करता येऊ शकते. अँड्रॉइडमध्ये ११२ हा क्रमांक डिफॉल्ट क्रमांक म्हणून सेट आहे. हा क्रमांक आपात्कालीन परिस्थितीत युजरला मदत पुरवतो. फोनचे पावर बटन दाबल्यानंतर आपात्कालीन क्रमांकावर कॉल लागतो. यासह लोकेशन शेअर करण्याचा देखील पर्याय मिळतो. इमरजेन्सी लोकेशन शेअरिंग फीचरमध्ये आरोग्याशी संबंधित माहिती देखील स्टोअर करता येऊ शकते. आजारी असल्यास आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ते मदत करू शकते.
(डिलीट झालेला मेसेज परत दिसेल, ‘असे’ वापरा Whatsapp Accidental Delete फीचर)
इमरजेन्सी सेवा अशी सुरू करा
- स्मार्टफोनचे पावर बटन काही सेकंदांसाठी दाबून ठेवा. त्यानंतर स्क्रिनवरील ‘इमरजेन्सी एसओएस’ फीचरवर टॅप करा.
- यानंतर स्मार्टफोन आपोआप ११२ क्रमांकावर संपर्क साधेल. हा संपर्क बंद करा. आता स्क्रीनवर खाली उपलब्ध असलेल्या ‘मेडिकल इन्फॉर्मेशन’ या पर्यायावर टॅप करा.
- यात आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती टाकून ‘एंटर’ करा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला ‘डन’ बटनवर क्लिक करायचे आहे.
(डॉक्टरने प्रेस्क्रिप्शनवर काय लिहिले हे चटकन ओळखता येणार, Google करणार मदत, जाणून घ्या कसे?)
आपात्कालीन परिस्थितीसाठी अॅपलमध्ये SOS फीचर
अॅपलने आयफोन १४ सिरीजमधील आयफोन्समध्ये एसओएस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर दिले आहे. हे फीचर चर्चेत आहे, कारण त्यामुळे अडचणीत सापडलेल्या काही लोकांना बचावण्यात मदत झाली आहे. अलास्कातील बर्फाळ प्रदेशात एक व्यक्ती अडकली होती. आयफोनच्या एसओएस फीचरमुळे तिला बचावण्यात मदत झाली. एसओएस फीचर सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी देते. मोबाईल नेटवर्क, वायफाय नसताना एसओएस फीचरद्वारे आपात्कालीन संदेश पाठवता येतो.