आजच्या घडीचं संवादाचं सर्वात प्रभावी आणि वेगवान माध्यम असलेलं व्हॉट्सॲप स्वत:मध्ये सतत बदल करताना दिसतं. दर काही दिवसांनी व्हॉट्सॲपचे नवनवे फीचर येत असतात आणि युजर्सना भुरळ घालत असतात. आताही व्हॉट्सॲपनं असंच एक भन्नाट फीचर आणलं आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप चॅटमध्ये प्रोफाइल फोटो पाहता येणार आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपने हे फीचर बीटा टेस्टिंगसाठी अनेक यूजर्ससाठी जारी केले आहे. तथापि, सध्या केवळ डेस्कटॉप क्लायंटसाठी वैशिष्ट्याची चाचणी केली जात आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर जगभरातील सर्व युजर्ससाठी हे फीचर खुले केले जाईल.
कसे काम करेल नवे फीचर ?
ग्रुप चॅट आता मेसेज बबलमधील नावासह इतर वापरकर्त्यांचा प्रोफाइल फोटो दर्शवेल. दुसरीकडे, जर युजर्सनी त्यांच्या प्रोफाईलवर फोटो टाकला नसेल तर तो त्याच रंगात दाखवला जाईल ज्यामध्ये ग्रुपवर नाव दिसेल. व्हॉट्सॲपचे नवीन फीचर त्याच पद्धतीने काम करेल ज्याप्रमाणे व्हॉट्सॲपने लोकांसाठी नोटिफिकेशन्समध्ये यूजर्सचा डीपी दाखवायला सुरुवात केली होती, जेणेकरून व्हॉट्सॲप नोटिफिकेशन्स इतर ॲप्सपेक्षा वेगळे करता येतील आणि मेसेज पाठवणाऱ्या युजर्सची ओळख पटवता येईल. फीचर Android आणि iOS दोन्हीसाठी जारी केले जाईल.
आणखी वाचा : सावधान! ‘या’ व्हॉट्सअॅप फीचरचा तुमच्याविरुद्ध होऊ शकतो गैरवापर; ‘अशी’ करा तक्रार, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
व्हॉट्सॲप आणताेय आणखी नवा फीचर
व्हॉट्सॲप अपडेट्स आणि फीचर्स इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म WABetaInfo ने म्हटले आहे की, ते आणखी एका नवीन एडिट मेसेज फीचरवर काम करत आहे. हे फीचर युजर्सना मेसेज पाठवल्यानंतर एडिट आणि अपडेट करण्याचा पर्याय देणार आहे. हे सध्या गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या २.२२.२०.१२ या एड़िशनचा एक भाग बनवलं गेलं आहे. वेबसाइटने या वैशिष्ट्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे आणि तो सध्या डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे.