pTron Tangent Sports neckband launch : नेकबँड घेण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. pTron कंपनीने आपले नवीन उत्पादन pTron Tangent Sports नेकबँड भारतात लाँच केले आहे. नेकबँड उत्तम बॅटरी लाईफ आणि स्टाइलीश डिजाईनसह सादर करण्यात आले आहे. नेकबँड दीर्घ टॉक टाईम आणि कॉलिंगदरम्यान स्पष्ट आवाज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
किंमत
pTron Tangent Sports नेकबँड खरेदीसाठी अमेझॉन इंडिया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मिडनाईट ब्लॅक, टील ग्रीन, लाइटनिंग ब्ल्यू आणि रेझिंग रेड या रंग पर्यायांमध्ये हे नेकबँड सादर करण्यात आले आहे. नेकबँडची मूळ किंमत ७९९ रुपये असून, कंपनीने सध्या ५९९ रुपयांच्या स्पेशल लाँच प्राइजसह हा फोन खरेदीसाठी उपलब्ध केला आहे.
(AIRTEL 5G: कोणत्या शहरांमध्ये एअरटेल ५ जी सेवा उपलब्ध? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
फीचर्स
नेकबँडमध्ये ट्रू टॉक, ईएनसी कॉलिंग आणि युजरला चांगला अनुभव देण्याचा दावा करणारे अॅप्टसेन्स हे मल्टिपल ऑडिओ फीचर देण्यात आले आहे. नेकबँडमधील ट्रू टॉक फीचर युजर आणि कॉलर यांच्यात त्रास मुक्त ऑडिओ संवाद घडवण्यास मदत करते. अॅप्टसेन्स ऑडिओ तंत्रज्ञान गेमिंगदरम्यान ४० एमएस लो लॅटेन्सीसह अधिक आवाज देत असल्याचा दावा करते.
पीट्रॉन टँजेंट स्पोर्ट्स नेकबँड आयपीएक्स ४ स्प्लॅश प्रुफ प्रमाणित असून ते यूएसबी टाइप सी चार्जिंगला सपोर्ट करते. नेकबँड सिंगल चार्जमध्ये ६० तासांची बॅटरी लाइफ देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला असून, नेकबँडमध्ये क्विक चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये नेकबँड ७ तासांचा प्लेबॅक देते.