नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच लोटले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला ऑनलाइन स्कॅम / फसवणुकीबद्दलच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये अनेक जण खोटे फोन कॉल्स, ईमेल, मेसेजेस इत्यादींचे शिकार बनले आणि त्यातून त्यांची हजारो-लाखो रुपयांची फसवणूक झाली होती. अशा गोष्टी विशेषत: अनेकदा ज्यांना तंत्रज्ञानाबद्दल किंवा ऑनलाइन फ्रॉड्सबद्दल फारशी माहिती नसते, त्यांच्यासोबत अधिक प्रमाणात होत असतात.

मात्र, पुण्यामधील, पिंपरी-चिंचवड येथील एका आयटी कर्मचाऱ्यासोबत हा ऑनलाइन फ्रॉड घडल्याची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव अविनाश कृष्णनकुट्टी कुन्नुबरम (वय ४०) [Avinash Krishnanakutti Kunnubaram] असे आहे. अविनाश यांना मार्च २०२३ मध्ये एका अनोळखी फोन नंबरवरून मेसेज आला होता. ‘काही ऑनलाइन टास्क पूर्ण करून तुम्ही पैसे कमावू शकता’, असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते, असा अहवाल हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखातून समजला आहे.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Loksatta Online organizes Fact Checking workshop Mumbai news
‘फेक न्यूज’ हा साऱ्या विश्वाचाच प्रश्न! लोकसत्ता ‘फॅक्ट चेक’ कार्यशाळेतील तज्ज्ञांचा सूर
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच

हेही वाचा : केवायसी (KYC) अपडेट करायला गेले आणि सर्व कमाई गमावून बसले हे आजोबा; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, २०२३ या वर्षात अनेक कंपन्यांचे लेऑफ [layoff] सुरू होते. म्हणजेच यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. हातात काम नसणाऱ्या आणि अशा कंपन्यांच्या अनिश्चिततेमुळे इतर अनेकांप्रमाणे अविनाश यांना अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी हा पर्याय योग्य वाटला. म्हणून त्यांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजला, ते हे काम पार्ट टाइम करण्यास तयार असल्याचे उत्तर दिले.

सोशल मीडियावरील पोस्ट लाइक करणे, असा तो ऑनलाइन टास्क होता आणि त्या बदल्यात अविनाश यांना पैसे मिळणार होते. खरे तर सुरुवातीला त्यांना त्यांचा टास्क पूर्ण झाल्यानंतर त्याचा मोबदला मिळाला होता. म्हणूनच या फसवणूक करणाऱ्यावर अविनाश यांचा चांगला विश्वास बसला. मात्र, नंतर त्या व्यक्तीने अधिक पैसे कमावण्यासाठी अविनाश यांना काही पैसे गुंतवणाऱ्या एका सशुल्क टास्क ग्रुपमध्ये सहभागी होण्यास तयार केले. अविनाशदेखील स्वेच्छेने त्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि डिसेंबर २०२३ च्या शेवटी त्यांनी एकूण २० लाख २३ हजार इतकी मोठी रक्कम ट्रान्स्फर केली. मात्र, तेव्हाच त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचेही लक्षात आले.

घडलेल्या सर्व प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन अविनाश यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी वाकड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. ती तक्रार, माहिती तंत्रज्ञान कलम ६६ [सी] आणि ६६ [डी] यांसह, आयपीसी कलम ४०६, ४१९, ४२० व ३४ अंतर्गत नोंदवली गेली.

कुणाबाबतही अशी लाखोंची फसवणूक होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अनेक नागरिक अशा प्रकारच्या खोट्या मेसेजेसना बळी पडतात. काही जण अधिक पैसे कमवण्यासाठी अशी मोठी गुंतवणूक करतात; तर काही जण आपली खासगी माहिती देऊन आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. जेव्हा आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे याची जाणीव होते, तोपर्यंत फसवणूक करणाऱ्याने तुमचा नंबर ब्लॉक केलेला असतो आणि त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला जाऊ शकत नाही.

हेही वाचा : विमानाचे तिकीट बुक करणे पडले महागात; बसला ४.४ लाखांचा फटका! नेमके प्रकरण जाणून घ्या….

मात्र, अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपण प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. त्यासाठी काय करावे ते पाहा…

१. अनोळखी फोन नंबर, ई-मेल आयडी, मेसेजेस यांच्यापासून सावध राहावे.

२. अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक डाऊनलोड करू नये किंवा अशा लिंकवर क्लिक करू नये.

३. आपली खासगी माहिती केवळ सुरक्षित वेबसाइट्सवरच शेअर करावी. वेबसाइटच्या यूआरएलमध्ये “https://” असल्याची खात्री करावी.

४. पैशासंबंधीचा व्यवहार असल्यास, संपर्क करणारी कंपनी किंवा व्यक्ती यांची प्रथम माहिती घ्यावी आणि ती योग्य व खरी असल्याची खात्री करावी.

५. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुमची सर्व उपकरणे अँटीव्हायरसयुक्त अपडेटेड ठेवा.

६. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या फसवणूक, सायबर स्कॅम यांच्याबद्दलची माहिती घ्या आणि ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धतींबद्दल सतर्क राहा.

७. जर तुम्हाला काही गडबड वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित त्यासंबंधी कार्यवाही करा.

Story img Loader