Apple Watch ने पुन्हा एकदा एका तरुणाचा जीव वाचवला आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील एका १७ वर्षीय मुलाने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. या मुलाने सांगितले की, तो जखमी अवस्थेत असताना त्याने ॲप्पल वॉचवरून आपल्या मित्रांना फोन केला. मित्रांनी येऊन त्याला वाचवले. स्मित मेथा नावाच्या या मुलाने आपल्यासोबत घडलेली ही घटना ॲप्पलचे सीईओ टिम कुक यांना शेअर केली. त्याच्या या मेलला टिम कुकने देखील उत्तर दिलं आहे.
स्मित मेथा यांनी टिम कुकला मेलद्वारे सांगितले की, लोणावळा परिसरात ट्रेकिंग करताना तो घसरला आणि टेकडीवरून थेट दरीत पडला. त्यामुळे त्याला अनेक दुखापती झाल्या. त्याने ताबडतोब त्याच्या अॅपल वॉचमधून मित्रांना फोन केला. त्याच्या मित्रांनी येऊन त्याला वाचवले. यासाठी त्याने टीम कुकचे आभार मानले.
( हे ही वाचा: Video: पायाने स्कूटी थांबवण्याच्या नादात तरुणीचा गेला भलताच तोल; थेट नाल्यात पडली अन…)
दरीत पडून झाडावर अडकला, ॲप्पल वॉचने असा वाचवला जीव
स्मित मेथा याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील घरातून तीन मित्रांसह तो लोणावळा ट्रेकिंगसाठी गेला होता. पावसाळ्याचा काळ होता, त्यामुळे खडकांमध्ये गुळगुळीतपणा होता. त्यामुळे परत येताना त्याचा पाय घसरला आणि तो १३० ते १५० फूट खोल दरीत पडला. पडताना तो झाडाच्या फांदीवर आणि खडकावर अडकला. यामुळे तो गंभीर जखमी झाला.
फोन सोबत नसतानाही Apple Watch उपयोगी आले
तो दरीत एका दगडाला पकडून होता. अचानक त्याला त्याचा फोन मित्राच्या बॅगेत राहिल्याचे लक्षात आले. पण सुदैवाने त्याच्या ॲप्पल वॉचमध्ये नेटवर्क चालू होते. याच्या मदतीने त्याने मित्रांना बोलावले. मित्रांनी येऊन त्याला वाचवले आणि तेथून बाहेर काढले. यानंतर स्मित मेथा याला लोणावळ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावत शस्त्रक्रिया करण्यात आली.
( हे ही वाचा: बायको मागच्या सीटवर बसलेली असताना या पठ्ठ्याने बुलेटवर काय केलं पाहिलं का? Video होतोय Viral)
स्मित मेथा याने टीम कुकला लिहिला मेल, सीईओने असे उत्तर दिले
स्मित मेथाने टीम कुकला त्याच्या मेलमध्ये लिहिले, ‘माझे ऍपल वॉच माझ्या बचावासाठी आले. मी फक्त त्याच्या मदतीनेचं महत्वाचे कॉल करू शकलो. पुण्याच्या तरुणाने पाठवलेल्या मेलच्या उत्तरात, ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याची स्टोरी शेअर केल्याबद्दल त्याचे आभार मानले. यासोबतच टीम कुकने असेही लिहिले की, ‘असे दिसते की हा एक भयानक अपघात होता.’