तंत्रज्ञानाचं युग असल्याने अभासी जगात वावर वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क होत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारखे सोशल मीडिया अॅपवरून व्यक्त होता येतं. मात्र ऑनलाइन गेमर्ससाठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितका वाव नसल्याचं समोर आलं आहे. ही गरज पाहता ऑनलाइन गेमर्ससाठी भारतीय स्टार्टअप कंपनीने क्लान हे सोशल मीडिया अॅप तयार केलं आहे. या माध्यमातून ऑनलाइन गेमर्संना नवा प्लॅटफॉर्म मिळणार आहे. “आजचे गेमर खूप वेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यांना एकमेकांशी संवाद साधायला आवडते. या विषयावर चर्चा करताना एक नातं निर्माण होतं. कारण त्यांची गेमप्रती रुची असते.”, असं क्लानचे सीईओ सागर नायर यांनी सांगितलं. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ईस्पोर्ट चाहते आणि गेमर्ससाठी समर्पित असणार आहे. “गेल्यावर्षीच्या उत्तरार्धात क्लानवर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर लिंकडिन आणि इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गेमिंगला व्यवसाय म्हणून ओळखत नाही. त्यामुळे ही संकल्पना पुढे आली. यामुळे गेमर्संना त्यांची ओळख मिळणार आहे.”, असंही त्यानी पुढे सांगितलं. क्लान सध्या बीटा टप्प्यात आहे आणि लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाइव्ह असेल.
Qlan: ऑनलाइन गेमर्ससाठी मिळणार नवा प्लॅटफॉर्म; भारतीय स्टार्टअप सोशल नेटवर्कसाठी सज्ज
ऑनलाइन गेमर्ससाठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितका वाव नसल्याचं समोर आलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-11-2021 at 13:23 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qlan a new platform for online gamers rmt