चीन आणि अमेरिका यांच्यात ६ जी मध्ये पुढे जाण्यासाठी जी स्पर्धा सुरु आहे त्यामुळे क्वाड समूह आता दूरसंचारच्या सुरक्षिततेबद्दल चिंचित आहे. दूरसंचार सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्यावर काम केले पाहिजे असे मत क्वाड समूहाने मांडले आहे. सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी क्वाड समूह सर्वोत्कृष्ट पद्धतीने काम करेल असे समूह म्हणाले. यामध्ये आगामी येणारी ६जी सेवेचाही समावेश आहे. क्वाड समूहात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांचा समावेश आहे.
३० आणि ३१ जानेवारी रोजी नवीन दिल्ली येथे क्वाडच्या सिनियर सायबर समूहाच्या बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात सांगितले की, ते सॉफ्टवेअर सेवा आणि ऊत्पादनांच्या सर्वोत्तम सुरक्षेसाठी पायाभूत सायबर सुरक्षेसाठी काम करत आहेत.
लंडनमधील थिंक टँक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) ने ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीन लष्करी उद्देशांसाठी ६जी टेक्नॉलॉजी वापरण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी तो केंद्रीकृत कमांड मॉडेलद्वारे निर्णय प्रक्रियेचा अवलंब करत आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका कमांड आणि ऑपरेशन प्रक्रिया सक्षम करण्याच्या धोरणांचा अवलंब करत आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये ६जी मध्ये बाजी मारण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. ६जी च्या वापरामुळे युद्ध उपकरणांच्या क्षमतेत बदल होईल. चीनच्या हायपरसॉनिक शस्त्रात्र इव्हेंटमध्ये ६जी महत्वपूर्ण भूमिका बजावेल असे IISS ने म्हटले होते. या टेक्नॉलॉजीमुळे हायपरसॉनिक गतीने सध्या भेडसावत असलेल्या दळणवळणातील अडथळ्याची समस्या दूर होणार आहे. यामुळेच क्वाड ग्रुप टेलिकॉम सुरक्षेबाबत चिंतेत आहे.