Railway Ticket Date & Name Correction Steps : ट्रेनने प्रवास म्हटलं की, सगळ्यात आधी ट्रेनचे तिकीट बुक करावे लागते. तसेच ट्रेनचे तिकीट बुक करताना चुका होणे सामान्य बाब आहे. विशेषत: जेव्हा आपण ही गोष्ट घाईघाईत करतो. जर तुम्ही चुकीच्या तारखेसाठी रेल्वे तिकीट (Railway Ticket) आरक्षित केले असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण- तुम्ही ते रद्द न करता, तुमची चूक सुधारू शकता. म्हणजेच भारतीय रेल्वे प्रवाशांना त्यांच्या तारखेत बदल करण्याची किंवा गरज भासल्यास तिकीट दुसऱ्याला हस्तांतरित करण्याची परवानगी देते. तुम्ही या सुविधेचा लाभ कसा घेऊ शकता आणि आवश्यक बदल कसा करू शकता हे जाणून घेऊ…

रेल्वेच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे (Key railway facilities you should know) …

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

१. कन्फर्म तिकिटावरील (Railway Ticket) प्रवासाची तारीख बदला.

२. कुटुंबातील जवळच्या सदस्याला तिकिटे हस्तांतरित करा.

३. शाळा किंवा प्रवासी गटांसाठी सामूहिक तिकिटे मॉडिफाय करा.

पण, ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, या सेवा विशिष्ट नियमांसह येतात आणि केवळ विशिष्ट परिस्थितीत लागू होतात.

मॉडिफिकेशनसाठी एलिजिबल तिकीट (Eligible tickets for modifications)

ऑफलाइन बुकिंग : फक्त रेल्वे आरक्षण काउंटरवर बुक केलेल्या तिकिटांसाठी तारीख किंवा नावात बदल करण्याची परवानगी आहे.

ऑनलाइन बुकिंग : आयआरसीटीसी वेबसाईट किंवा ॲपद्वारे बुक केलेल्या तिकिटांमध्ये बदल करता येत नाहीत.

हेही वाचा…Black Friday Sale : सॅमसंग गॅलेक्सीचे वॉच आणि एअरबड्स झाले स्वस्त, फिचर्ससह किंमत किती रुपयांनी झाली कमी जाणून घ्या

तुमचे तिकीट कुटुंबातील सदस्याकडे हस्तांतरित करा (Transfer your ticket to a family member)

रेल्वे तिकीट हस्तांतरणाही परवानगी देते. पण, ही सेवा कुटुंबातील जवळच्या सदस्यांपुरती मर्यादित आहे. जसे की… पालक, भावंड, मुले किंवा जोडीदार. तर शैक्षणिक सहलींसाठी बुक केलेल्या ग्रुप तिकिटांसाठी, योग्य कागदपत्रांसह ग्रुप सदस्यांमध्ये हस्तांतर केले जाऊ शकते.

तिकिटावरील नाव आणि तारीख बदलण्यासाठी सोप्या स्टेप्स (Steps to modify the date or name on a Railway ticket) …

१. तुमच्या जवळच्या रेल्वेस्थानकाला भेट द्या.
२. नाव बदलण्यासाठी, प्रवासाच्या किमान २४ तास अगोदर रेल्वेस्थानकावर जा
३. तारीख बदलण्यासाठी ४८ तास अगोदर रेल्वेस्थानकावर जा.

आवश्यक कागदपत्रे जमा करा (Submit the Required Documents)

लेखी अर्जासोबत मूळ तिकीट बरोबर ठेवा.

फेरबदल शुल्क भरा (Pay the Modification Fee)

तिकीट बदलांवर प्रक्रिया करण्यासाठी शुल्क आकारले जाईल.

जशी सीट उपलब्ध असेल ती, नवीन तारीख किंवा नाव तुमच्या तिकिटावर अपडेट केले जाईल. त्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वेच्या सेवांसह तुमच्या ट्रेनचा प्रवास सोपा करू शकता. तेव्हा चुकीच्या तारखेला किंवा चुकीच्या नावाखाली बुकिंग करण्यासारख्या चुकांमुळे आता ताण घेण्याची गरज नाही. या सोप्या पायऱ्यांसह तुम्ही तुमचे आरक्षण सहजपणे बदलून, तुमचा प्रवास करू शकता.

Story img Loader