Raksha Bandhan 2023 Gadget Gift Ideas: रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या नात्यातील हा एक आनंदाचा दिवस असतो. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणतील महत्त्वाच्या सणांमध्ये रक्षाबंधनाचाही समावेश होतो. या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशानुसार कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

देशभरातील भाऊबहीण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तूही देतात. यंदा ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. शुभ मुहूर्ताच्या वेळी भावाला राखी बांधल्यास हे फलदायी सिद्ध होते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.  रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला काय गिफ्ट द्यावे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर सध्या टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे. आज आपण अशी काही गॅजेट्स पाहणार आहोत ती तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट म्हणून देऊ शकता.

aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
Gondavalekar Maharaj punyatithi mahotsav ,
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यात सुरू
actress ankita lokhande mother in law ranjana jain wishes her birthday in special note
“मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान…”, अंकिता लोखंडेला वाढदिवसानिमित्ताने सासूबाईकडून मिळालं खास गिफ्ट, म्हणाल्या…
nagpur university film festival
२ लाखांपर्यंत पुरस्कार जिंकण्याची संधी, नागपुरात प्रथमच होणार चित्रपट महोत्सव
Eknath Shinde, Eknath Shinde tenure decision,
महायुतीच्या यशाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या भाजपला शिंदेंचा चाप, मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचेही योगदान

हेही वाचा : तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर राहतोय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून साजरे करा रक्षाबंधन

Xbox series S

Xbox Series S हे गॅजेट तुम्ही तुमच्या बहिणीला भेट देऊ शकता. Xbox गेम पाससह Xbox Series S तुम्हाला एका छोट्या मासिक किंमतीमध्ये सर्व नवीनतम गेम वापरण्याची परवानगी देते. कन्सोल 2K रिझोल्यूशन आणि १२० FPS पर्यंत नेटिव्ह गेम खेळू शकतो. याची किंमत ३४,४९० रूपये इतकी आहे.

Nothing Phone 1

Nothing Phone 1 फोनची किंमत ३२,९९९ रूपये आहे. Nothing Phone 1 स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १२ ओएस, ६.५५ इंच फूल एचडी ओलईडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्लस प्रोसेसर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेज, दोन ५० मेगापिक्सेल कॅमेरे, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा, ४ हजार ५०० एमएएच बॅटरी, ३३ वॅट वायर चार्जिंग, १५ वॅट वायरलेस चार्जिंग, ५ वॅट रिवर्स चार्जिंग फीचर मिळते. रक्षाबंधनाच्या दिवशी हा स्मार्टफोन गिफ्ट म्हणून तुम्ही बहिणीला देऊ शकता.

Sony LinkBuds

सोनी लिंक बड्स ही TWS इअरबड्समधील सर्वात युनिक जोडी आहे. जे तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट देऊ शकता. यामध्ये तुम्हाला चांगली ऑडिओ क्वालिटी मिळते. सोनी लिंक इअरबड्स हे रिसायकल केलेल्या प्लास्टिक पासून तयार करण्यात आले असून हे वजनाला हलके देखील आहेत. तसेच हे इअरबड्स कानात एकदम नीट बसतात. याची किंमत १९,९९० रूपये आहे.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलवरून Aadhaar शेअर करताय? UIDAI ने दिला ‘हा’ इशारा

Apple Air Tag

अँपल एअर टॅग हे एक चांगले गॅजेट आहे. जर का तुमच्या बहिणीला आपल्या वस्तू कधीकधी विसरण्याची सवय असेल तर हे गॅजेट नक्कीच त्यांची मदत करू शकते. जसे की वही, वॉलेट किंवा मोबाइल असे अन्य गोष्टी एखाद्या ठिकाणी विसरल्यास एअर टॅग त्या वास्तूचे स्थान तुम्चाला अचूकपणे दर्शवतो. याची बॅटरी वर्षभर चालते व ती बदलणे देखील सोपे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा वापर करण्यासाठी तुमच्या बहिणीकडे आयफोन असणे आवश्यक आहे.

Story img Loader