देशभरात सध्या ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणत्याही ठिकाणी आपण गेलो की शक्यतो आपण देण्याऐवजी ऑनलाईन स्वरूपात त्या गोष्टीचे पेमेंट करतो. ऑनलाईन पेमेंटमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे काही क्षणातच आपल्याला पाठवता येतेय. याच देशातील ऑनलाईन पेमेंटबद्दल आरबीआयकडून एक मोठी बातमी समोर येत आहे.

आरबीआय बँकेने बुधवारी देशातील ३२ विद्यमान पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्सना ऑनलाईन पेमेंट अ‍ॅग्रीगेटर म्हणून काम करण्याची तत्वतः मान्यता दिली आहे. याद्वारे देशातील नागरिकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय बाजारामध्ये उपलब्ध होणार आहेत.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा : Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन बदलणार सरड्यासारखा रंग, विश्वास बसत नसेल तर Video बघाच

RBI ने दिलेल्या माहितीनुसार ज्या पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्सना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे त्यात Amazon (Pay) India Private Limited, Google India Digital Services Private Limited (Google India Digital Services Private Limited), Infibeam Avenues Limited, Reliance Payment Solutions आणि Zomato Payments Private Limited यांचा समावेश आहे. आरबीआयच्या माहितीनुसार आणखी १८ विद्यमान अ‍ॅग्रीगेटर अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आहे , त्यांनाही लवकरच परवानगी दिली जाऊ शकते.

आरबीआयने ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून की पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम कायदा २००७ च्या अंतर्गत प्राप्त झालेल्या ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर्सच्या अर्जाच्या स्तितीबाबत सांगितले आहे आहे. Cred, Razorpay आणि PhonePe यासह किमान १८५ फिनटेक कंपन्यांनी पेमेंट अ‍ॅग्रीगेटरच्या परवानगीसाठी अर्ज केले होते.