भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२२ मध्ये UPI Lite नावाची एक नवीन पेमेंट सर्व्हिसची सुरूवात केली. ही युपीआय पेमेंट सर्व्हिस एक साधी सोपी सर्व्हिस आहे. जी वापरकर्त्यांना बँकेच्या प्रक्रियेतील समस्या अयशस्वी समस्यांना तोंड न देता दररोज लहान किंमतीचे व्यवहार सुरू करण्याची परवानगी देते. सध्याच्या काळामध्ये फोन पे , गुगल पे आणि पेटीएमी आणि अन्य डिजिटल Apps चा वापर डिजिटल पेमेंट करण्यासाठी केला जातो. तसेच देशामध्ये युपीआय पद्धतीने पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युपीआय लाइट UPI ची एक सोपी पद्धत आहे. जी लहान किंमतीच्या व्यवहारांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. नियमित युपीआय व्यवहार करण्यासाठी १ लाख रुपयांची दैनंदिन मर्यादा आहे. युपीआय लाइट वापरण्यासाठी वापरकर्त्यांनी प्रथम त्यांच्या लिंक केलेल्या बँक अकाउंटद्वारे त्यांच्या UPI Lite अकाउंटमध्ये पैसे जोडणे आवश्यक आहे. एकदा का अकाउंट जोडले गेले की वापरकर्ते दिवसामधून दोन वेळा युपीआय लाइट अकाउंटमध्ये २ हजार रुपये जोडू शकतात. एकूण दैनंदिन मर्यादा ही ४ हजार रुपये इतकी आहे. याबाबतचे वृत्त India टूडे ने दिले आहे.

हेही वाचा : CJI IIT Madras: “या अत्याधुनिक…”; IIT मद्रासच्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं वक्तव्य

ज्या वापरकर्त्यांना लहान रकमेचे तसेच सारखे पेमेंट करावे लागते त्यांच्यासाठी UPI Lite हा एक चांगला पर्याय आहे. ही एक सोयीस्कर आणि लवचिक पेमेंट पद्धत देखील आहे. कारण लाइट वापरकर्त्याला त्यांचे अकाउंट कधीही बंद करण्याचा किंवा त्यांच्या लाइट अकाऊंटमधून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये एका क्लिकवर कोणत्याही शुल्काशिवाय पैसे ट्रान्सफर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Google Pe वर युपीआय लाइट कसे वापरायचे ?

१. सर्वात पहिल्यांदा गुगल पे ओपन करावे.

२. त्यानंतर उजव्या बाजूला असणाऱ्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे.

३. आता पे पिन फ्री युपीआय लाइटवर क्लिक करा.

४. तुमच्या युपीआय लाइट बॅलेन्समध्ये पैसे जोडण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या सूचनेचे पालन करावे. त्यात तुम्ही एका वेळी २ हजार रुपये जोडू शकता.

५. पैसे जोडण्यासाठी UPI Lite ला सपोर्ट करणारे एक बँक अकाउंट निवडावे.

६. एकदा का तुम्ही तुमच्या युपीआय लाइटमध्ये बॅलन्समध्ये पैसे जोडले की तुम्ही युपीआय पिनशिवाय २०० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता.

७. पेमेंट करताना तुम्हाला तुमचा युपीआय पिन टाकण्यासाठी सांगितले जाते तेव्हा फक्त युपीआय लाइट हा पर्याय निवडावा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi introduced upi lite how to use send money without pin on gpay paytm and phone pe tmb 01