देशातील करोडो फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता डिजिटल पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज भासणार नाही. जुन्या पद्धतीच्या फीचर फोनवरूनही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. आपल्या देशात अनेक लोकं फीचर फोन वापरतात. त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागात राहणारे लोकं ही महागडे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा असलेले फीचर फोन वापरतात. अशा लोकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक मोठी भेट दिली आहे. RBI ने आज (मंगळवार) फीचर फोनसाठी UPI आधारित पेमेंट उत्पादन लाँच केले आहे. याच्या मदतीने आता फीचर फोन वापरकर्ते सहज डिजिटल पेमेंट करू शकतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२४x७ हेल्पलाइन देखील उपलब्ध असेल

मंगळवारी एका ट्विटमध्ये आरबीआयने म्हटले की, “आरबीआय गव्हर्नर फीचर फोनसाठी यूपीआय सुविधा UPI123Pay आणि डिजिटल पेमेंटसाठी २४x७ हेल्पलाइन – Digisathi हे आज दुपारी १२ वाजता सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान या हेल्पलाइनचा लाभ वेबसाइट ‘Digisathi.com’ आणि ‘१४४३१ ‘ आणि ‘१८०० ८९१ ३३३३’ या फोननंबर व वेबसाइटवरून घेता येईल. याच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या समस्येचे सात दिवस २४ तास समाधान मिळू शकणार आहे.” RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फीचर फोनसाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली होती. UPI ही देशातील लोकप्रिय पेमेंट प्रणाली म्हणून उदयास आली आहे. दरम्यान UPI चे पूर्ण रूप युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आहे.

याद्वारे आर्थिक सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील

फीचर फोन्समध्ये स्मार्टफोनसारखे फीचर्स नसतात. हे अत्यंत कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. फीचर फोनमध्ये कॉल आणि टेक्स्ट मेसेज करण्याची सुविधा आहे. RBI गव्हर्नर यावेळी म्हणाले की, देशातील आर्थिक सुविधांचा आवाका वाढवण्यासाठी फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंटच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. यामुळे देशातील ४०० दशलक्ष फीचर फोन वापरकर्ते पेमेंट सेवा वापरू शकतील.

UPI व्यवहार ७६ लाख कोटींवर पोहोचले आहेत

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात आतापर्यंत UPI व्यवहार ७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत जे मागील आर्थिक वर्षात ४१ लाख कोटी रुपये होते. ते म्हणाले की, तो दिवस दूर नाही जेव्हा एकूण व्यवहाराचा आकडा १०० लाख कोटींवर पोहोचेल. एका अंदाजानुसार, देशातील ४०० दशलक्ष मोबाइल फोन वापरकर्त्यांकडे सामान्य फीचर फोन आहेत.