Reaction of girl after mother lost job at meta : काही दिवसांपूर्वी ट्विटर आणि मेटा या जगातील नामांकित कंपन्यांमधून लोकांना काढण्यात आले होते. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. मंदी आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा नोकर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. मेटामधील ११ हजार कर्मचाऱ्यांना ( META LAYOFFS ) कामावरून काढून टाकण्यात आले होते. यात शेली केलिश यांचाही समावेश होता. नोकरीवरून काढल्याबाबत शेलीला दुख झाले. मात्र, यावर त्यांच्या मुलीने जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे त्यांचा या संकटाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला.
नोकरीवरून काढून टाकल्याचे दुख शेली यांना होते, मात्र त्यांच्या मुलीला याचा आनंद वाटला. शेली यांची मुलगी ६ वर्षांची आहे. आईची नोकरी गेल्याचा तिला अनंद वाटत होता, कारण यामुळे दोघेही एकत्र वेळ घालवू शकतात.
(मोठ्या स्क्रीनवर पाहा व्हिडिओ, फोनला WIRELESS पद्धतीने टीव्हीशी करा कनेक्ट, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
बिझिनेस इनसाइडरनुसार, नोकरी काढण्यात आल्याचा मेल आला की नाही हे तपासण्यासाठी केलिश सकाळी ६.३० ला उठल्या. मी फोन तपासले असता, मोठा इमेल दिसला. इमेलच्या सुरुवातीच्या काही ओळींमध्येच नोकरीवरून काढल्याचे सांगण्यात आले होते, असे केलिशने सांगितले.
केलिश यांनी फोन बंद केला. पतीला आणि मुलांना जवळ बोलवले. नंतर केलिश यांनी आपल्या धाकट्या मुलीला नोकरी गेल्याची माहिती दिली. ज्यावर मुलीने नोकरीवरून का काढले असे विचारले आणि नंतर आईसोबत अधिक वेळ घालवता येईल याबाबत ती आनंदी झाली. तुला माझ्यासोबत आणखी वेळ घालवता येईल, असे केलिश यांच्या मुलीने प्रतिक्रिया दिली.
नोकरी जाणे दुखद होते, मात्र मुलीच्या प्रतिक्रियेने याकडे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहता आले, असे केलिश यांनी सांगितले. तुझी नोकरी गेली, याबद्दल सॉरी. पण, तू अजूनही सर्वोत्तम आई आहे, अशी प्रतिक्रिया केलिश यांच्या सहा वर्षीय मुलीने दिली.
(एका चार्जवर ७ दिवस चालणार, ब्लूटूथ कॉलिंगसह लाँच झाली COLORFIT LOOP SMARTWATCH, किंमत केवळ..)
नोकरी गेल्यावर दुख वाटते. पुढे काय होणार याची चिंता होते. अशात धीर आणि आत्मविश्वासाची गरज असते. केलिश यांच्या चिमुकलीने म्हटलेले शब्द नक्कीच त्यांना धीर देणारे आणि आनंद देणारे ठरले असतील.