लोकप्रिय व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सअॅपवर अनेक असे फीचर्स आहेत, ज्याबाबत यूजर्सला माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या अशाच एका फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही समोरील व्यक्तीचा मेसेज वाचला आहे, हे देखील त्या व्यक्तीला समजणार नाही. तुम्ही अॅप न उघडता किंवा पाठवणाऱ्याला कळवल्याशिवाय WhatsApp मेसेज वाचण्याचा मार्ग शोधत आहात का? तर आज ही युक्ती तुमच्या नक्कीच कामी येईल.
अनेकांना व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज वाचल्यानंतर आपण रिड केलयं हे दाखवायचे नसते, आज आम्ही तुम्हाला या इंस्टंट मेसेजिंग ॲपमधले मेसेज गुप्तपणे वाचण्यासाठी खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने युजर्स मेसेज सहज आणि पूर्णपणे मेसेज वाचू शकतील, तसेच मेसेज वाचल्याचा रीड रिपोर्ट समोरच्याला व्यक्तिला जाणार नाही.
(हे ही वाचा : ‘व्हॅलेंटाइन डे’ला पार्टनरला गिफ्ट द्यायचंय? मग द्या ‘हा’ iPhone, मिळतोय ‘इतका’ स्वस्त, पहिल्यांदाच आली मोठी ऑफर )
‘असे’ वाचा कोणाचेही व्हाॅट्सअॅप मेसेजेस
- तुमच्या Android स्मार्टफोनच्या मुख्यपृष्ठावर लॉन्ग प्रेस करा.
- पुढे, ‘Widgets’ वर टॅप करा. सर्व अॅप Widgets स्क्रीनवर दिसतील.
- WhatsApp Widgets शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. त्यावर टॅप करा.
- Widgets तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर जोडले जाईल.
- ‘पूर्ण झाले’ वर टॅप करा.
- आता, Widgets लांब दाबा आणि वर हलवा.
विजेट यशस्वीरित्या सेट केल्यानंतर, तुम्हाला व्हॉट्स अॅपनुसार चॅट संदेश संरेखित केलेले दिसतील. तुम्ही येथे पूर्ण संदेश वाचू शकता. तथापि, कोणत्याही चॅटवर टॅप करणे टाळा, कारण ते व्हॉट्सअॅप चॅट उघडेल आणि संदेशाच्या पुढे एक डबल ब्लू टिक दिसेल.