Realme 10 series: जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रियलमी (Realme) आपली पुढील शक्तिशाली स्मार्टफोन मालिका Realme 10 लाँच करणार आहे. ही मालिका Realme 9 चे उत्तराधिकारी म्हणून बाजारात लाँच केली जाईल. ‘Realme 10 Pro + आणि Realme 10’ या लाइनअपचे पहिले डिव्हाइस म्हणून लाँच केले जाऊ शकतात. कंपनीचा नवीनतम 4G स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये ९ नोव्हेंबर रोजी थेट कार्यक्रमादरम्यान सादर होणार आहे. चायना टेलिकॉम साइटवरून ही माहिती समोर आली आहे.

काय आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये ?

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Horror Movies On OTT (1)
हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
Gold Price Today Gold In Mumbai Check Latest Gold And Silver Prices On 1 November 2024 mumbai pune nagpur gold price silver price on 1 November 2024 google trends
Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले का? गुगलवरही ट्रेंड होणारा सोन्याचा आजचा भाव पाहा

Realme 10 Pro+ या शक्तिशाली स्मार्टफोनची वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. Realme 10 Pro+ ला ६.७-इंचाचा फुल HD+ AMOLED वक्र डिस्प्ले मिळेल. यात काही १२०Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आढळू शकते. हे उपकरण अलीकडेच चीनच्या हार्डवेअर सर्टिफिकेशन वेबसाइट TENAA वर दिसले आहे.

आगामी Realme 10 4G Android १२-आधारित Realme UI ३.० वर चालतो. यात ९०Hz रिफ्रेश रेट आणि ३६०Hz टच सॅम्पलिंग रेटसह फुल-एचडी+ (१,०८०×२,४०० पिक्सेल) सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हे ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी G९९ प्रोसेसरसह ८ जीबी पर्यंत ऑनबोर्ड रॅम आणि ८ जीबी पर्यंत डायनॅमिक रॅमसह जोडलेले आहे.

आणखी वाचा : Spotify ची जबरदस्त ऑफर: प्रीमियम सदस्यता भारतात सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध!

कॅमेरा

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, Realme मध्ये ५०-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. याच्या फ्रंटला १६-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सपोर्ट देखील आहे.

बॅटरी

Realme 10 4G मध्ये UtraBoom स्पीकर देण्यात आला आहे, जो उच्च-रिझोल्यूशन ऑडिओ गुणवत्तेला सपोर्ट करू शकतो. यात ५,०००mAh बॅटरी आहे, जी २१ तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय हा स्मार्टफोन ३३W SuperVOOC फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

किंमत

Realme 10 मालिकेची सुरुवातीची किंमत भारतात रु. १५,००० ते रु. १७,००० पर्यंत असण्याची अपेक्षा आहे.