REALME 10 Pro + 5G : कॅमेरा आणि आकर्षक डिजाईन यासाठी रिअलमीचे फोन लोकप्रिय आहेत. अशात रिअलमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने ग्राहकांसाठी दोन नवीन स्मार्टफोन उपलब्ध केले आहेत. कंपनीने भारतात Realme 10 Pro+ 5G आणि Realme 10 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. काय आहेत या दोन्ही फोनच्या किंमती आणि कोणते आकर्षक फीचर्स मिळत आहेत, याबाबत जाणून घेऊया.
किंमत
Realme 10 Pro+ 5G या स्मार्टफोनचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंट २८ हजार ९९९ रुपयांमध्ये, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंट २५ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी रोम व्हेरिएंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे.
Realme 10 Pro 5G स्मार्टफोनबाबत बोलायचे झाल्यास फोनचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंट १८ हजार ९९९ रुपयांमध्ये, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रोम व्हेरिएंट १९ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे.
(डेटा चोरीवर लागणार लगाम, युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘APPLE’ची नवीन योजना)
दोन्ही स्मार्टफोन हायपरस्पेस, डार्क मॅटर आणि नेब्युला ब्ल्यू या तीन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन्स तुम्ही फ्लिपकार्ट, रिअलमी.कॉम आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळांवरून खरेदी करू शकाल. Realme 10 Pro+ 5G १४ डिसेंबरपासून, तर Realme 10 Pro 5G १६ डिसेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
फीचर
Realme 10 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच कर्व्ह अमोलेड डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय ४.०, ऑक्टा कोअर ६ एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० ५ जी एसओसी, माली जी ६८ आणि ८ जीबी रॅम मिळते. फोनमध्ये १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ५ हजार एमएएच बॅटरी मिळत असून ती ६७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन ४७ मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.
(चॅट होणार आणखी मजेदार, व्हॉट्सअॅपवर मिळाले फेसबुक सारखे फीचर, काय आहे खास? जाणून घ्या)
Realme 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी + डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय ४.०, स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी एसओसी, अड्रिनो ए६१९ जीपीयू, ८ जीबी रॅम, १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा, ५ हजार मेगाहर्ट्झची बॅटरी, ३३ वॉट सुपर व्हीओओसी फास्ट चार्जिंग मिळते. फोन २० मिनिटांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.