Realme एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. रिअलमीने भारतात अखेर Realme 11 Pro 5G सिरीज लॉन्च केली आहे. रिअलमीने या सिरीजअंतर्गत Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन रिअलमी स्मार्टफोन चीनमध्ये मे २०२३ मध्येच लॉन्च करण्यात आले आहेत. सध्या रिअलमी ११ प्रो ५जी स्मार्टफोन भारतात २३,९९९ रुप्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदीसाठी ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Realme 11 Pro 5G चे फीचर्स

रिअलमी ११ प्रो ५जी स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या स्क्रीनचा टच सॅम्पलिंग रेट हा ३६०Hz इतका आहे. तसेच यामध्ये ड्युअल नॅनो सिमचा सपोर्ट आहे. तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 प्रोसेसर ग्राफिक्ससाठी Mali-H68 GPU देण्यात आले आहे. यामध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 स्किनसह येतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! २०० MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाली Realme ची ‘ही’ जबरदस्त सिरीज, ड्युअल नॅनो सिमसह मिळणार…

Realme 11 Pro 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रिअलमी प्रो ५ जी मध्ये OIS सह १०० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर प्रो + व्हेरिएंटमध्ये १००W SuperVOOC चा फास्ट चार्जिंग सपोर्ट तर रिअलमी प्रो मध्ये ६७ W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो.

Realme 11 Pro 5G भारतातील किंमत आणि सेल ऑफर्स

रिअलमी ११ प्रो ५जी भारतामध्ये तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. ८/१२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. ८/२५६ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. १२/२५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे.

हेही वाचा : Father’s Day 2023: ‘फादर्स डे’ निमित्त वडिलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ वर्कआउट गॅजेट्स, जाणून घ्या

रिअलमीचा हा स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्ट आणि Realme.com वर उपलब्ध आहे. रिअलमी ११ प्रो ५जी स्मार्टफोनच्या सेल ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन खरेदी करणाऱ्यांना ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजच्या खरेदीवर HDFC आणि ICICI बँकेच्या कार्डवर १,५०० रुपयांची सूट मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme 11 pro 5g avaliable on flipkart sale offer hdfc and icici bank 100 mp camera check price and features tmb 01