सध्या स्मार्टफोन हा मानवाच्या महत्वाच्या गरजांपैकी एक झाला आहे. आपली अनेक कामे ही स्मार्टफोनच्या मदतीने होत असतात. नवीन फोन खरेदी करत असताना आपण अनेक कंपन्यांचे फोन पाहत असतो. त्याची तुलना करून बघतो. ते केल्यावरच आपण कोणता स्मार्टफोन घ्यायचा ते ठरवतो. नुकतेच samsung आणि Realme ने आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तर आज आपण या दोन फोनमधील फीचर्स , किंमत , कॅमेरा त्यांची तुलना जाणून घेणार आहोत.

सॅमसंग Galaxy F54 vs रिअलमी 11 Pro+ 5G चे फीचर्स

रिअलमी 11 Pro+ 5G मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा फुलएचडी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा स्क्रीन टच रेट हा ३६० Hz इतका आहे. यामध्ये ड्युअल नॅनो सिमकार्डचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 प्रोसेसर ग्राफिक्ससाठी Mali-H68 GPU देण्यात आले आहे. यामध्ये १२/ ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 स्किनसह येतात.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! २०० MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाली Realme ची ‘ही’ जबरदस्त सिरीज, ड्युअल नॅनो सिमसह मिळणार…

नवीन Samsung Galaxy F54 मध्ये ६.७ इंचाचा स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० Hz इतके आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले मिळतो. मोबाईलच्या डिस्प्लेचे नुकसान होऊ नये म्हणून स्क्रीनवर गोरिला ग्लासचे ५ कोटिंग देण्यात आले आहे. याचे बॅक कॅमेऱ्याचे डिझाईन फ्लॅगशिप Galaxy S23 फोन सारखाच आहे. हा फोन कंपनीच्या होम-ब्रूड Exynos 1380 चिपसेटद्वारे समर्थित आहे, जे अलीकडे लॉन्च झालेल्या Galaxy A34 ला देखील पॉवर करत आहे. ५ जी फोन लेटेस्ट अँड्रॉइड १३ OS वर चालतो. सॅमसंग कंपनी ४ वर्षांचे OS अँडग्रेड आणि ५ वर्षांचा सुरक्षा पॅच देण्याचे आश्वासन देत आहे. 

कॅमेरा

Realme 11 Pro+ 5G या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा Samsung HP3 प्रायमरी सेंसरसह येतो. हा सेंसर Super OIS सपोर्ट देतो. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतात. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा ग्राहकांना मिळणार आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर प्रो + व्हेरिएंटमध्ये १००W SuperVOOC चा फास्ट चार्जिंग सपोर्ट तर रिअलमी प्रो मध्ये ६७ W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो.

व्याने लॉन्च झालेला सॅमसंग Galaxy F54 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्यामध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.सॅमसंगच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६००० mAh क्षमतेची बॅटरी जी एका दिवसापेक्षा जास्तीचा बॅकअप देते. त्याला २५ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे . हा फोन चार्जरसह दिला जात नाही. चार्जर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा : VIDEO: Samsung ने लॉन्च केला ‘हा’ तगडा स्मार्टफोन, १०८ MP चा कॅमेरा आणि…, एकदा फीचर्स पहाच

किंमत

Realme 11 Pro+ 5G च्या ८/२५६ जीबी या व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये ठेवण्यात आली असून, १२/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये असणार आहे. या फोनची विक्री Amazon, Realme ची अधिकृत साईटवर आणि रिटेल स्टोअरमध्ये १५ जूनपासून सुरू होणार आहे.

Samsung Galaxy F54 या फोनची सुरूवातीची किंमत ही भारतामध्ये २७,९९ रुपये आहे. ही किंमत १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.