सध्या अनेक नवनवीन आणि उत्तम स्मार्टफोन कंपन्यांसोबत स्पर्धेत उतरलेला Realme 12 Pro नुकताच भारतामध्ये लाँच झालेला आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये अनेक सुंदर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन मिळत आहेत. यामध्ये फोटोग्राफीपासून ते बॅटरी आणि स्टोरेज सर्वच बाबींमध्ये हा फोन भारी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. काय आहे Realme 12 Pro स्मार्टफोनची किंमत पाहा. तसेच विकत घेण्याआधी त्याच्या फीचर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Realme 12 Pro

१. डिझाइन

रियलमीने जरी नवा स्मार्टफोन लाँच केला असला, तरीही त्याचे डिझाइन, रचना ही जुन्या फोनसारखीच ठेवलेलीआहे. असे असले तरीही त्यात थोडेफार बदल केलेले आपण पाहू शकतो. त्यामध्ये उत्तम ग्रीप आणि स्मार्टफोनची आकर्षकता वाढवण्यासाठी लेदर फिनिश डिझाइन उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन अधिक पातळ आणि हलक्या वजनाच्या डिझाइनचा आहे.

हेही वाचा : अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

२. स्क्रीन आणि डिस्प्ले

Realme 12 Pro या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचे curved OLED पॅनल बसवलेले आहे. तसेच १२०Hz रिफ्रेश रेट, ९५० nits ब्राईटनेस सर्व HDR कन्टेन्टमध्ये देण्यात आले आहे आणि २४०Hz पेक्षा अधिक सॅम्पलिंग रेट आहे. स्क्रीनमध्ये उत्तम कॉन्ट्रास्टसह व्हायब्रन्ट रंग असल्याने वापरकर्त्याला यावर कोणतेही व्हिडीओ किंवा फोटो पाहण्याचा उत्तम अनुभव मिळू शकतो.

३. फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट बसवण्यात आली आहे. यामध्ये ८ GB रॅम + १२८ GB स्टोरेज आणि ८GB रॅम + २५६ GB स्टोरेज अशा दोन प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहेत. Realme 12 Pro हा अँड्रॉइड १४ या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत आहे.

४. कॅमेरा

उत्तम फोटोग्राफी आणि व्हिडीओ काढण्यासाठी यामध्ये ट्रिपल रेअर कॅमरा बसवण्यात आला आहे. त्यामध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर + ८ मेगापिस्केल अल्ट्रावाईड अँगल सेन्सर + ३२ मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर, २x ऑप्टिकल झूम बसवलेले आहे. उत्तम सेल्फी आणि व्हिडीओ कॉल, मीटिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

हेही वाचा : फ्लिपकार्टवरून मागवला आयफोन, मात्र ग्राहकासोबत झाला Scam; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

५. बॅटरी

स्मार्टफोन दिवसभर टिकण्यासाठी यात ५०००mAh पॉवरची बॅटरी बसवण्यात आली आहे. चार्जिंग जलद होण्यासाठी यात ६७W इतक्या पॉवरचा चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे.

६. किंमत

भारतामध्ये इतके फीचर्स आणि एवढा भारीतला कॅमेरा देणारा Realme 12 Pro हा चक्क ३० हजार रुपयांच्या आत ग्राहकांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची सुरुवात बाजारामध्ये २५,९९९ इतक्या रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करू शकतात.

एकंदरीत हा स्मार्टफोन जवळपास सर्व-सामान्यांना परवडणारा असून, इतर स्मार्टफोन कंपन्यांपेक्षा स्वस्तात बरेच सुंदर फीचर्स देत आहे असे दिसते. अशी माहिती इंडिया टुडेच्या लेखावरून समजते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme 12 pro most affordable smartphone with great features and specifications check out the price and basic review dha
Show comments