Realme 13 Pro 5G Series India Launch Date : रिअलमी १३ प्रो ५जी (Realme 13 Pro 5G) सीरिज या महिन्याच्या शेवटी भारतात लाँच होणार आहे. या लाइनअपमध्ये रिअलमी १३ प्रो ५जी व रिअलमी १३ प्रो प्लस ५जी यांचा समावेश असेल. कंपनीने काही दिवसांपूर्वी आगामी स्मार्टफोनच्या डिझाइन्सबद्दलची माहिती दिली होती. सोबत त्यांचे काही प्रमुख कॅमेरा फीचर्स, लाँच तारीख व रंग पर्याय यांची माहिती दिली आहे. तर चला या लेखातून याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

लाँच करण्याची तारीख, रंग पर्याय (Realme 13 Pro 5G Series India Launch Date, Colour Options)

रिअलमी १३ प्रो ५जी सीरिज भारतात ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता लाँच केली जाईल. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर याबद्दलची माहिती दिली आहे. लाइनअपची अधिकृत मायक्रोसाइट दाखवते की, रिअलमी १३ प्रो ५जी व रिअलमी १३ प्रो प्लस ५जी या दोन्ही मॉडेल्सची रचना त्यांच्या आधीच्या मॉडेल्ससारखीच असेल. व्हेगन लेदर फिनिशव्यतिरिक्त, आगामी स्मार्टफोन काचेच्या बॅक कव्हर्ससह येतो. रिअलमी १३ प्रो ५जी सीरिज हॅण्डसेटचा बॅक कॅमेरा गोलाकार आकारात आहे. त्यावर सोनेरी बॉर्डर आहे. स्मार्टफोनच्या उजव्या किनारी पॉवर बटण आणि व्हॉल्युम रॉकर दर्शवतात.

हेही वाचा…Jio vs Airtel: कोणती कंपनी ऑफर करतेय सगळ्यात स्वस्त प्लॅन? कोणता रिचार्ज करायचा? किंमत, डेटा, सबस्क्रिप्शन पाहून ठरवा!

पोस्ट नक्की बघा…

रिअलमी १३ प्रो ५जी मोनेट गोल्ड व मोनेट पर्पल या रंगपर्यायांमध्ये; तर उच्च श्रेणीचा १३ प्रो प्लस ५जी एकाच रंगात मोनेट गोल्डमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. कंपनीने एका प्रेस नोटमध्ये सांगितले की, स्मार्टफोन एमराल्ड ग्रीन कलरवेमध्ये देखील उपलब्ध असेल; ज्याला लेदर फिनिश असेल.

रिअलमी १३ प्रो ५जी सीरिजमध्ये AI-सपोर्टेड कॅमेरा फीचर देण्यात आले आहे. फोन्सना हायपरिमेज+ कॅमेरा सिस्टीम, थ्री लेअर AI इमेजिंग टेक्नॉलॉजी आहे. ऑन-डिव्हाइस आणि क्लाउड-आधारित AI इमेजिंग दोन्हीसाठी सपोर्ट आहे. दोन्ही हॅण्डसेट TÜV राईनलँड हाय-रिझोल्युशन कॅमेरा सर्टिफिकेशनसह येतात, असेही म्हटले जाते. कंपनीने हेदेखील उघड केले आहे की, Realme 13 Pro+ 5G ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS)सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी Sony LYT-701 सेन्सर व 3x पर्यंत ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सेल Sony LYT-600 पेरिस्कोपने सज्ज आहे.