Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro + 5G स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू झाली आहे. तुम्हाला या दोनपैकी एखादा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही Flipkart किंवा realme.com वर ऑनलाइन खरेदी करू शकता. तुम्ही या दोन्ही वेबसाइटवर HDFC बँक कार्डने पेमेंट केले, तर तुम्हाला Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro + 5G स्मार्टफोनवर दोन हजार रुपयांची सूट मिळेल. या दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घेऊयात.

Realme 9 Pro 5G, Realme 9 Pro+ 5G ची किंमत: Realme 9 Pro 5G ची भारतात किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरू होते. ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी १७,९९९ रुपये किंमत आहे.तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २०,९९९ रुपये आहे. तर Realme 9 Pro + 5G च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २४, ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज फोनची २६,९९९ रुपये आहे. तर टॉप-ऑफ-द-लाइन ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २८,९९९ रुपये आहे.

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर

Realme 9 Pro 5G स्पेसिफिकेशन आणि फीचर्स: रियलमीच्या या फोनबद्दल बोलायचे झाले तर हा अँड्रॉइड १२ वर चालतो. जे रियलमी UI ३.० शी जोडलेले आहे आणि १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ६.६ -इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी पॅनेल आहे. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ SoC, Adreno ६१९ जीपीयू आणि ८ जीबीपर्यंत रॅमसह समर्थित आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. जो ६४ एमपी प्राथमिक कॅमेरा, f1.79 लेन्ससह ८ एमपी वाइड-एंगल शूटर आणि २ एमपी मॅक्रो लेन्स आहे. तर समोर १६ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/A-GPS, USB Type-C आणि ३.५ एमएम हेडफोन आहे. याशिवाय, यात ५००० एमएएच बॅटरी आहे आणि ३३ वॅट डार्ट चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याची जाडी ८.५ मिमी आणि वजन १९५ ग्रॅम आहे.

तुमचे Gmail खाते दुसरे कोणी वापरत नाही ना? ‘या’ सोप्या ट्रिक्सच्या मदतीने जाणून घ्या

Realme 9 Pro+ 5G स्पेसिफिकेशन आणि फीचर्स: Realme 9 Pro+ 5G देखील अँड्रॉइड १२ वर आधारित आहे. रियलमी UI ३.० सह येतो. फोनमध्ये ९० एचझेड रिफ्रेश रेटसह ६.४ इंचाचा फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले २.५ डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास पाच प्रोटेक्शन आणि १८- एचझेडचा टच सॅम्पलिंग रेट देतो. Realme 9 Pro+ मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 920 SoC आणि ८ जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आहे. Realme 9 Pro + ५ जीमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ५० एमपी सोनी IMX766 प्राथमिक सेन्सर आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.2 अल्ट्रा-वाइड लेन्ससह ८ एमपी सोनी IMX355 सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो शूटरचा समावेश आहे. तर Realme 9 Pro+ मध्ये f/2.4 लेन्ससह १६ मेगापिक्सेलचा सोनी IMX471 सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये ५ जी, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, USB-Type-C आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक समाविष्ट आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरी आहे, जी ६० वॅट सुपरडार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे वजन १८२ ग्रॅम आहे.