व्हॅलेंटाईन वीक कालपासून सुरू झाला आहे. यानिमित्त विविध कंपन्या सेल जाहीर करत आहेत, तर तुम्हीदेखील नवनवीन फीचर्स आणि ऑफर्ससह स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण – रिअलमी कंपनीने व्हॅलेंटाईन डे २०२४ साठी सेलची घोषणा केली. या सेलमध्ये लोकप्रिय नाझरो (Narzo) सीरिजवर अनेक ऑफर देण्यात येणार आहेत. रिअलमी नाझरो ६०प्रो ५जी, रिअलमी नाझरो ६० एक्स ५जी, रिअलमी नाझरो एन५५ आणि रिअलमी एन ५३ वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या विक्रीमध्ये बँक ऑफर, कूपन्सचा समावेश आहे. तसेच हा सेल Amazon.in आणि realme.com वर कालपासून सुरू झाला असून तो १२ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

रिअलमी नाझरो सीरिज ऑफर :

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

१. रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी (Narzo 60 Pro Series 5G) : हा फोन तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉंच करण्यात आला होता, तर या सेलमध्येसुद्धा तीन वेगवेगळ्या ऑफरसह स्मार्टफोन उपलब्ध असेल. रिअलमी नार्झो ६० प्रो ५जीची सध्याची प्राईज २९,९९९ रुपये आहे. हा १२ जीबी प्लस १ टीबी व्हेरिएंट तुम्ही दोन हजार रुपयांच्या बँक सवलतीसह २७,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. त्याचप्रमाणे १२ जीबी प्लस २५६ जीबी व्हेरिएंटची सध्याची किंमत २६,९९९ रुपये आहे, ज्यामध्ये कूपन डिस्काउंटचा समावेश आहे. तसेच तिसरा व्हेरिएंट ८ जीबी प्लस १२८ जीबी २३,९९९ रुपयांना INR बँक ऑफर सहित २१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

२. रिअलमी नाझरो ६० : रिअलमी नाझरो ६० चा पहिला व्हेरिएंट ८ जीबी प्लस १२८ जीबी या सेलमध्ये बँक ऑफरसह १४,९९९ रुपयांना उपल्बध आहे. तसेच या स्मार्टफोनची मूळ किंमत १७,९९९ रुपये आहे. सेलमध्ये २००० रुपये किमतीच्या ऑफर आणि अतिरिक्त १००० रुपयांच्या बँक ऑफरसह रिअलमी नाझरो ६० चा दुसरा व्हेरिएंट १६,९९९ रुपयांना उपल्बध असणार आहे; ज्यामध्ये ८ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज पर्याय दिला जाईल.

३. रिअलमी नाझरो ६० एक्स ५ जी : रिअलमी नाझरो ६० एक्स ५ जी आकर्षक बँक ऑफरसह उपल्बध आहे. यामध्ये ६ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे; ज्याची सध्याची किंमत १४,९९९ आहे. तसेच ४ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरिएंट १०,९९९ रुपयांना सेलमध्ये उपल्बध असणार आहे.

४. रिअलमी नाझरो एन ५५ आणि एन ५३ वर वापरकर्त्यांना ऑफर मिळवण्याची संधी आहे. नाझरो एन ५५ ६जीबी प्लस १२८जीबी व्हेरिएंट, ज्याची सध्याची किंमत १२,९९९ रुपये आहे. ऑफरमध्ये चार हजार रुपयांच्या सूटनंतर हा फोन ८,९९९ रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येईल. नाझरो एन५३ मॉडेल ४जीबी प्लस ६४जीबी ७,४९९ रुपयांना आणि ८जीबी प्लस १२८जीबी ९,४९९ रुपयांना स्टोरेज पर्यायांमध्ये कूपनसह उपल्बध आहे.

हेही वाचा…Lava ने भारतात लाँच केला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फीचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! किंमत फक्त…

रिअलमी नाझरो स्मार्टफोन फीचर्स :

रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी : रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा कर्व्ह डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हा फोन मीडिया टेक Dimensity 7050 चिपसेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. 

रिअलमी नाझरो ६० एक्स ५ जी : रिअलमी नाझरो ६० एक्स ५ जी फोनमध्ये ६.७२ इंचाचा एएचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे ; जे 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्मार्टफोन मीडिया टेक Dimensity ६१०० प्लस प्रोसेसर वर काम करतो.या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ एमपी कॅमेरा आहे.

रिअलमी नाझरो एन ५३ : रिअलमी नाझरो एन५३ मध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. रिअलमीच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो.

रिअलमी नाझरो एन ५५ : या फोनमध्ये तुम्हाला ६.७२ इंचाचा फुल HD + LCD स्क्रीनचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला ९०Hz चा रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. या फोनचे रिझोल्युशन हे १०८०X२४०० पिक्सल इतके आहे.रिअलमीच्या या फोनमध्ये तुम्हाला ६४ मेगापिक्सलचा AI प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे.