Realme ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नेहमीच नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी Realme C51 हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. यामध्ये अनेक फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. हा स्मार्टफोनची किंमत देखील जास्त नाही आहे. रिअलमी C51 या स्मार्टफोनची किंमत, त्याचे फीचर्स आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

Realme C51: फीचर्स

रिअलमी सी ५१ या स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९०Hz इतका असणार आहे. रिअलमीच्या या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा मिळतो. यात व्हिडीओ , नाइट मोड तसेच पॅनोरामिक व्ह्यू असे फिचर मिळणार आहेत. यात आश्चर्यकारक सेल्फ-पोर्ट्रेट कॅप्चर करण्यासाठी ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

हेही वाचा : Bengaluru Tech Summit: कर्नाटकच्या आयटी मंत्र्यांनी केली बंगळुरू टेक समिटच्या तारखांची घोषणा, जाणून घ्या

रिअलमी C51 मध्ये ३३ W च्या SUPERVOOC चार्जींगसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी वापरकर्त्यांना देण्यात आली आहे. २८ मिनिटांमध्ये हा फोन ० ते ५० टक्के चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. तसेच वापरकर्ते हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. हे डिव्हाइस २ टीबीपर्यंत एक्सटर्नल मेमरीला सपोर्ट करते. तसेच यामध्ये मेमरी कार्डसह दोन सिम कार्ड देखील ठेवता येणार आहेत.

किंमत आणि उपलब्धता

रिअलमी सी ५१ हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज अशा एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत ८,९९९ रुपये असणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. हा फोन १२८ जीबी पर्यंत ROM आणि ४जीबी + ४ जीबी डायनॅमिक रॅमसह येतो. खरेदीदार HDFC बँक आणि ICICI बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या व्यवहारांवर ५०० रुपयांच्या झटपट डिस्काउंटसह बँक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता.