कालच Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी Nothing कंपनीने देखील आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याचा सेल २१ जुलैपासून सुरु होणार आहे. तर आज आपण Realme C53 आणि Nothing Phone (2) या दोन फोनमध्ये असणारे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल तुलना जाणून घेणार आहोत.

Realme C53 : स्पेसिफिकेशन्स

रिअलमीच्या हा नवीन स्मार्टफोन ड्युअल सिम (नॅनो), अँड्रॉइड १३ आधारित Realme UI T वर चालतो. यामध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. हा फोन १.८२ GHz पीक फ्रिक्वेन्सीसह ऑक्टा कोअर १२ nm चिपसेटद्वारे समर्थित आहे. तसेच यात ६ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि ARM Mali-G57 GPU सह जोडण्यात आले आहे. यामध्ये १२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. 

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

हेही वाचा : Realme ने लॉन्च १०८ मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन, किंमत १० हजारांपेक्षा कमी

Nothing Phone (2): स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Realme C53 : कॅमेरा

Realme C53 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये १०८ मेगापिक्सल AI समर्थित प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळवणारा हा सेगमेंटचा पहिला हँडसेट असल्याचा दावा केला जात आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यात १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे २ टीबी पर्यंत वाढवता येते.

Nothing Phone (2): कॅमेरा

फोटोग्राफीसाठी नथिंग फोन (२) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

Realme C53

Realme C53 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, GPS/AGPS, Wi-Fi, Bluetooth 5, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेन्सरमध्ये accelerometer, मॅग्नेटिक सेन्सर, गायरो मीटर सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे.

Nothing Phone (2)

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित NothingOS 2.0 वर चालतो. यात ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ४५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. केवळ २० मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के इतका चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी USB टाईप -सी पोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : नुकत्याच लॉन्च झालेल्या Nothing Phone (2) आणि iQOO Neo 7 Pro 5G मध्ये कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? फीचर्स, किंमतीमधील फरक बघाच

Realme C53 : किंमत आणि उपलब्धता

Realme C53 च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. हे टॉप मॉडेल आहे. हा फोन चॅम्पियन गोल्डन आणि चॅम्पियन ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Realme.com आणि Flipkart या वेबसाईटवर २६ जुलै पासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

iQOO Neo 7 Pro 5G किंमत आणि ऑफर्स

Nothing Phone (2) फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे. तसेच १२/२५६ जीबी स्टोरे व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तसेच १२/५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये असेल. फोन (२) अ‍ॅक्सेसरीजमध्ये १,२९९ रुपयांची असणारी केस, ९९९ रुपयांचे स्क्रीन प्रोटेक्टर आणि २,४९९ रुपयांचे पॉवर अ‍ॅडॉप्टर यांचा समावेश आहे. तसेच नाथानं फोन (२) २१ जुलैपासून भारतात Flipkart वर दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उप्लब्ध असणार आहे.