कोका-कोला कोल्ड्रिंकचे नाव तुम्ही ऐकले असेलच. हे कोल्ड्रिंक तुम्ही प्यायले ही असेल. बाजारामध्ये लहान दुकानांपासून मोठ्या मॉलमध्ये या कंपनीचे कोल्ड्रिंक मिळते. आता याच कंपनीने टेक क्षेत्रात पदार्पण करत अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर Realme ने आपला नवीन Coca-Cola स्पेशल एडिशन फोन ‘Realme 10 Pro 5G’ भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे या फोनच्या मागच्या बाजूस तुम्हाला ड्युअल टोन डिझाईन येते. तसेच ब्लॅक आणि रेड कोका कोला रंग मिळणार आहे. यासोबतच दोन्ही कंपन्यांचे ब्रॅंडिंग बॅक पॅनलवर दिसणार आहे.

हेही वाचा : Coca Cola लवकरच लाँच करणार आपला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण

या स्मार्टफोनचे फिचर्स

नवीन Realme 10 Pro 5G मध्ये ८GB RAM आहे, अंतर्गत स्टोरेज क्षमता कंपनीने अद्याप उघड केलेली नाही. Realme 10 Pro हँडसेटचा डिस्प्ले आकार ६.७२ इंच आहे, LCD स्क्रीन १०८० पिक्सेल रिझोल्यूशन आणि १२०Hz रिफ्रेश रेट आहे. यामध्ये २४०Hz चे टच सॅम्पलिंग देखील दिसत आहे. या फोनमध्ये, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६MP फ्रंट कॅमेरा आहे आणि यासाठी डिस्प्लेच्या मध्यभागी एक होल पंच कट आउट दिसू शकतो. फोनच्या आतील भागात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन Android १३ वर आधारित Realme UI ४.० ऑपरेटिंग सॉफ्टवेअरवर काम करतो.

स्मार्टफोनची किंमत

Realme 10 Pro 5G ची Coca Cola ही सिरीज मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आलेलया Realme 10 Pro 5G सारखीच असणार आहे. खरेतर कंपनीने हा स्मार्टफोन मागच्या वर्षी लॉन्च केला होता. रिअलमी कंपनीने coca cola कंपनी सोबत करार केल्यामुळे आज पुन्हा एकदा नवीन डिझाईनमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. Realme च्या या फोनची किंमत २०,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्ही Flipkart Realme च्या अधिकृत वेबसाईट व Realme स्टोअरवरून १४ फेब्रुवारीपासून दुपारी १२ नंतर खरेदी करू शकणार आहात.