Realme GT 2 Pro vs OnePlus 10 Pro : जर तुम्ही लेटेस्ट स्मार्टफोनचे शौकीन असेल, तर नुकतेच दोन नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत, जे 5G टेक्नॉलॉजी आणि अॅडवान्स फिचर्सनी सुसज्ज आहेत. त्याचबरोबर या दोन्ही स्मार्टफोनची किंमत ५० ते ७१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. जर तुम्हाला Realme GT 2 Pro आणि OnePlus 10 Pro स्मार्टफोनपैकी एक निवडायचे असेल, तर या दोन्ही स्मार्टफोनची फिचर्स, स्पेसिफीकेशन आणि किंमत जाणून घ्या.

Realme GT 2 Pro vs OnePlus 10 Pro ची किंमत – Realme GT 2 Pro ची बेस मॉडेल 8GB + 128GB स्टोरेजसाठी ४९,९९९ रुपये किंमत आहे. तसंच 12GB + 256GB स्टोरेज ऑप्शनसाठी ५७,९९९ रुपये. हा स्मार्टफोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल आणि १४ एप्रिलपासून Realme.com, Flipkart, रिटेलर स्टोअर्समधून खरेदी करता येईल.

यासह, Realme 9 4G च्या 6GB + 128GB रॅम आणि स्टोरेजची किंमत १७,९९९ आहे तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. हँडसेट मेटर ब्लॅक, स्टेज व्हाइट आणि सनगोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे १२ एप्रिलपासून Realme.com, Flipkart आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते.

OnePlus 10 Pro ने दोन व्हेरिएंट सादर केले आहेत, 8GB / 128GB व्हेरिएंटची किंमत ६६,९९९ रुपये आहे. तर 12GB/256GB व्हेरिएंट मॉडेलची किंमत ७१,९९९ रुपये असेल. हा फोन ५ एप्रिल २०२२ पासून Amazon India वरून खरेदी करता येईल.

आणखी वाचा : Vivo Y21G स्मार्टफोन लॉन्च, तासनतास वापरल्यानंतरही गरम होणार नाही, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 Pro vs OnePlus 10 Pro स्पेसिफिकेशन – Realme GT 2 Pro स्मार्टफोन Realme UI 3.0 वर आधारित Android 12 द्वारे समर्थित आहे. हा फोन 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससह 6.7-इंच 2K AMOLED डिस्प्लेसह येतो. Snapdragon 8 Gen 1 SoC द्वारे समर्थित आहे, जे 12GB RAM सह कनेक्टेड आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी स्टीललेस मेटलसोबत कूलिंग फीचरही जोडण्यात आले आहे.

तर OnePlus 10 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये पंच होल डिस्प्ले डिझाइन आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus प्रथमच आपल्या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत आहे. यासोबतच हा Android 12 आणि ColorOS 12 वर चालतो. हे 12GB LPDDR5 रॅमसह जोडले जाऊ शकते. OnePlus 10 Pro 5,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जरसह येतो.

Realme GT 2 Pro vs OnePlus 10 Pro चा कॅमरा – Realme GT 2 Pro फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये ५० MP Sony IMX766 प्राइमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड, 2MP मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय Realme GT 2 Pro मध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यामध्ये 512GB स्टोरेज वेगळे जोडले जाऊ शकते.

OnePlus 10 Pro मध्ये 48MP मुख्य सोनी लेन्स, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8MP मॅक्रो शूटरसह ट्रिपल रिअर कॅमेरे पॅक केले आहेत. 10 Pro मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus 10 Pro देखील Hasselblad ब्रँडिंगसह येतो.