Realme ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. रिअलमी भारतात लवकरच आपले Realme 11 5G आणि Realme 11X 5G हे दोन स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे. मिड रेंज मधील रिअलमी ११ ५जी स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ६७ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रिअलमी ११ एक्स जी मध्ये ६४ मेगापिक्सलचा AI कॅमेरा आणि ३३ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
Realme 11 5G: अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
टिपस्टर अंभोरेने उघड केले की Realme 11 5G मध्ये ६.७२ -इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले असण्याची शक्यता आहे जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हे MediaTek Dimensity 6100+ chipset द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत, स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरासह येऊ शकतो ज्यामध्ये 108MP प्राथमिक सेन्सर आणि LED फ्लॅशसह 2MP खोलीचा सेन्सर समाविष्ट आहे. यात 16MP AI फ्रंट कॅमेरा येण्याची अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : Made In India iPhone: खुशखबर! अॅपल भारतात लवकरच iPhone 15 चे उत्पादन सुरू करणार
या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ६४ W चे फास्ट चार्जिंग मिळू शकते. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI वर चालतो. हा फोन ८/१२८ आणि ८/२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उप्लबन्ध होऊ शकतो. तसेच हा फोन ग्लोरी गोल्ड, ग्लोरी ब्लॅक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो.
Realme 11X 5G : अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
Realme 11X 5G मध्ये ६.७२ -इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले असण्याची शक्यता आहे जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर एलईडी फ्लॅशसह येऊ शकतो. यात सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा AI कॅमेरा मिळू शकतो.
फोनच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते ज्याला ३३ W चे चार्जिंग सपोर्ट येईल. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI वर चालण्याची अफवा आहे. हा फोन ६/१२८ आणि ८/२५६ जीबी स्टोरेज असलेल्या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. हा फोन र्पल डॉन, मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये येऊ शकतो.
हेही वाचा : प्रतीक्षा संपली! Telegram ने आणले भन्नाट फिचर, पोस्ट केल्यानंतर देखील करता येणार एडिट
Realme 11 5G आणि Realme 11x 5G २३ ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होणार आहे. या फोनचा लॉन्चिंग इव्हेंट दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. हा इव्हेंट तुम्ही कंपनीच्या अधिकृत युट्युब पेजवर आणि सोशल मीडिया हँडलवर पाहू शकता.