Realme ही एक लोकप्रिय मोबाईल कंपनी आहे. या कंपनीने नुकतीच आपली बजेट -फ्रेंडली Narzo 60 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. ज्यामध्ये Narzo 60 Pro 5G आणि Narzo 60 5G या दोन फोन्सचा समावेश आहे. गोलाकार कॅमेरा सेटअप आणि लेदर बॅक ही दोन प्रमुख आकर्षणे या फोनमध्ये असणार आहेत. १५-१६ जुलै रोजी होणाऱ्या Amazon प्राईम डे सेलमध्ये Narzo 60 5G आणि Narzo 60 Pro 5G हे दोन फोन्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या दोन्ही फोनवरील ऑफर्स व किंमत , फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

रिअलमी Narzo 60 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा कर्व्ह डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हा फोन MediaTek Dimensity 7050 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच वापकर्त्यांना यामध्ये १२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज वापरायला मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 वर चालतो.

How to book cheap flights using this feature Google Flights
How To Book Cheap Flights : आता विमानाने प्रवास करणं होईल स्वस्त? गूगलने आणलंय नवं फीचर; कसं वापरायचं बघा
Meta Platforms confirmed that it is laying off employees
Meta Announces Layoffs : इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या कर्मचाऱ्यांना थेट…
Diwali Online Shopping Scams
Online shopping scams: एक क्लिक आणि लाखोंचा गंडा; दिवाळीला खरेदी करताना काय काळजी घ्याल?
affordable Jio phones under 1500 rupees in marathi
Affordable Jio Phones : रिचार्जपेक्षा कमी किमतीत जिओचा फोन, जिओ सिनेमा, जिओ पे यांचा करता येईल वापर; वाचा फीचर्स
WhatsApp New Video Call Feature Low Light Mode
WhatsApp Video Call Feature : मिट्ट काळोखातही दिसा ठळक, व्हॉट्सॲपने व्हिडीओ कॉलसाठी आणलंय खास फीचर
Online or Offline which method is better for buying a smartphone
Online vs Offline : सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? जरा थांबा! ऑनलाइन घ्यावा की ऑफलाइन त्यासाठी ही माहिती वाचा
how to schedule Happy Birthday message
Video : आता मित्र नाराज होणार नाही! रात्री १२ पर्यंत न जागता द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा? असा करा Happy Birthday चा मेसेज शेड्युल
Sundar Pichai talks about what Google looks for in aspirants
Sundar Pichai : गूगलमध्ये नोकरी करायची आहे? सुंदर पिचाईंनी सांगितल्या ‘या’ तीन अटी, बघा तुम्ही आहात का पात्र?
Reliance Jio launched two new prepaid plans
Jio Recharge Plans : सतत वेब सीरिज पाहताय, तर कधी स्विगीवरून फूड ऑर्डर करताय? मग हे रिचार्ज प्लॅन ठरतील तुमच्यासाठी बेस्ट

हेही वाचा : मेटाने ‘Threads’ अ‍ॅप लॉन्च केल्यामुळे Twitter चं टेन्शन वाढणार; जाणून घ्या कसे डाउनलोड करायचे?

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये १०० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जी OIS आणि २ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्सला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तसेच ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ६७W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

रिअलमी Narzo 60 5G चे स्पेसिफिकेशन्स

रिअलमी नाझरो ६० ५ जी या फोनमध्ये ६.४३ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. हा फोन MediaTek Dimensity 6020 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये कंपनीने ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 वर चालतो.

नाझरो प्रो ५ जी या मॉडलप्रमाणेच यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ३३ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

हेही वाचा : तब्बल ११ वर्षानंतर Mark Zuckerberg यांनी केलं ट्वीट, नेमका विषय काय?

किंमत आणि ऑफर्स

रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/१२८ जीबीची किंमत २३,९९९ रुपये, १२/२५६ जीबीची किंमत २६,९९९ रुपय आणि १२/१ टीबीची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर रिअलमी नाझरो ६० ५जी हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आणि ८/२५६ जीबीची किंमत १९,९९९ रुपये असणार आहे.

ग्राहकांना हे दोन्ही फोन मार्स ऑरेंज(Mars Orange ) आणि कॉस्मिक ब्लॅक(Cosmic Black ) या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहेत.

Realme Narzo 60 सीरिजचे प्री-बुकिंग कालपासून सुरू झाले असून १४ जुलै रोजी संपणार आहे. विक्री ऑफरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खरेदीदारांना प्री-ऑर्डर दरम्यान SBI आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १,५०० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. रिअलमी नाझरो ६० प्रो ५जी आणि रिअलमी नाझरो ६० ५जी या फोन्सची पहिली विक्री १५ जुलै रोजी Amazon आणि Realme च्या अधिकृत वेबसाईटवर होणार आहे.