Realme ही लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आपला Realme Pad 2 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. Realme C53 बरोबरच या Realme Pad 2 चे लॉन्चिंग करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये टॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत आणि याची किंमत काय असणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
Realme Pad 2: स्पेसिफिकेशन्स
Realme Pad 2 मध्ये 2K रिझोल्यूशनसह ११.५ इंचाचा डिस्प्ले आणि १२० Hz चा अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. डिस्प्लेला ४५० नीट्स पीकचा ब्राईटनेस आणि ८५.२ टक्के स्क्रीन स्क्रीन-टू-बॉडी रेशो ऑफर करण्यात आला आहे. रिअलमी पॅड २ ला MediaTek Helio G99 SoC सपोर्ट मिळतो. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. यामध्ये कंपनी एक व्हर्च्युअल रॅमचे फिचर देखील देते. यामध्ये १६ जीबी पर्यंत रॅम वाढवता येते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
Realme Pad 2 मध्ये टेक्स्ट स्कॅनिंग सपोर्टसह ८ मेगापिक्सलचा AI रिअर कॅमेरा सेन्सर मिळेल. कॅमेरा मागील बाजूस गोलाकार मॉड्यूलमध्ये देण्यात आला आहे. रिअलमीच्या या नवीन पॅड २ मध्ये ८,३६० mAh क्षमतेची बॅटरी आणि यामध्ये १७ तसेच प्ले बॅक टाइम व १९० तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देण्याचा दावा केला जात आहे. तसेच टॅबलेटला ३३ W चे SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
नवीन Realme Pad 2 मध्ये मल्टी-स्क्रीन कोलॅबोरेशन, स्क्रीन मिररिंग, ड्युअल विंडो, स्पिल स्क्रीन आणि स्मार्ट साइडबार यासारख्या सॉफ्टवेअर फीचर्स येतात. रिअलमी पॅड २ टॅबलेट Relame UI 4.0 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो.
किंमत
Realme Pad 2 चा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. Realme Pad 2 साठी प्री-ऑर्डर २६ जुलैपासून सुरू होणार आहे. ग्राहक रिअलमी पॅड २ Inspiration Green आणि Imagination Grey रंगांमध्ये खरेदी करू शकतात. १ ऑगस्टपासून याची विक्री Realme अधिकृत स्टोअर आणि Flipkart द्वारे सुरू होईल.