Realme ही एक चिनी कंपनी आहे. ही कंपनी मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनी आपली Realme 11 ही सिरीज भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाली आहे. रिअलमी कंपनी भारतामध्ये आपले Realme 11 Pro+ आणि Realme 11 Pro स्मार्टफोन लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी हे फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. या फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात. तसेच हा फोन कधी लॉन्च होणार हे सुद्धा जाणून घेऊयात.

Realme 11 Pro+ चे फीचर्स

रिअलमी प्रो ११ + मध्ये वापरकर्त्यांना मेटलचे फ्रेम आणि बॅक साईड ही प्लेन लेदर यामध्ये मिळणार आहे. यामध्ये ६.७ इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. तसेच हा फोन MediaTek Dimensity 7050 चिपसेट आणि Mali-G68 GPU द्वारे समर्थित आहे. यामध्ये तुम्हाला १२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. यायची रॅम ८ जीबी इतकी वाढवता येऊ शकते.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

वापरकर्त्यांना या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार असून ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा २०० मेगापिक्सलचा असणार आहे. ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो शूटर लेन्स आहे. सेल्फीसाठी यामध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि १०० W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

हेही वाचा : Twitter CEO पदी निवड झाल्यानंतर लिंडा याक्करिनो यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “उज्वल भविष्यासाठी मस्क यांच्या…”

Realme 11 Pro चे फीचर्स

रिअलमी ११ प्रो चे डिझाईन हे रिअलमी प्रो + या फोनसारखेच आहे. यामध्ये ६.७ इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. तसेच हा फोन MediaTek Dimensity 7050 चिपसेट आणि Mali-G68 GPU द्वारे समर्थित आहे. त्यात १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजचा सपोर्ट आहे. यामध्ये १०० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ६७ w चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : VIDEO: WearOS स्मार्टवॉचवर WhatsApp कसे डाउनलोड करायचे? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

काय असू शकते किंमत ?

टिप्सस्टर डेबायन रॉय ने दावा केला आहे, कंपनी Realme 11 Pro+ आणि Realme 11 Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रिअलमी प्रो ची किंमत ही २२,००० ते २३,००० दरम्यान असू शकते. तर रिअलमी ११ प्रो + या फोनची किंमत २८,००० ते २९,००० रुपये असू शकते. प्रसिद्ध टिपस्टर डेबायन रॉय यांनी पुष्टी केली आहे की हे स्मार्टफोन भारतात १६ मे रोजी लॉन्च होतील. मात्र रिअलमी कंपनीने लॉन्चिंगबद्दल अधिकृत सांगितलेलं नाही.

Story img Loader