स्मार्टफोन हा आपल्या सर्वांची प्रमुख गरज बनला आहे. या एका लहानशा डिव्हाइसवरून आपण कितीतरी कामे वेगाने करत आहोत. आपण रोज भरपूर वेळ स्मार्टफोनवर अॅक्टिव्ह असतो. ऑफिसचे काम असेल नाहीतर इतर वेळी आपण सोशल मीडिया वापरण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करत असतो.
यंदा या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो (MWC )बार्सिलोनो येथे होणार आहे. या शो मध्ये अनेक कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन्सचे लॉन्चिंग करणार आहेत. या शो मध्ये Realme कंपनी या मोबाईल शो मध्ये जगातील पहिला २४० वॅटचे चार्जिंग असलेला स्मार्टफोन Realme GT 3 लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा लॉन्च इव्हेंट तुम्ही ऑनलाईन स्वरूपात पाहू शकणार शकणार आहात. हा फोन किती तारखेला लॉन्च होणार आहे आणि याचे फीचर्स या फोनच्या किंमतीबद्दल आपण जाणून घेऊयात.
Realme GT 3 चे फिचर्स
Realme GT 3 या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७४ इंचाचा AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. याच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा 144Hz इतका आहे. या फोनमध्ये मागच्या बाजूस ट्रिपल कॅमेरा सिस्टीम असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स कॅमेरा असू शकतो. तसेच मॅक्रो शॉट्ससाठी ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा असे तीन कॅमेरा असू शकतात. वापरकर्त्यांना फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सलचा मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये Qualcomm चा सर्वात वेगवान Snapdragon 8+ Gen 1 SoC प्रोसेसर बघायला मिळू शकतो. हा प्रोसेसर १२ किंवा १६ जीबी रॅम तसेच २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजला सपोर्ट करेल.
हे आहे स्पेशल फिचर
हा स्मार्टफोन Realme GT Neo 5 चा ग्लोबल व्हर्जन असेल, जो अलीकडेच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये खास फिचर असे आहे की , या फोनला २४० वॅटचे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. या फोनमध्ये ४६००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे हा फोन १० मिनिटांच्या आतमध्येच १०० टक्के चार्ज होतो. कंपनीने या संबंधित एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. Realme GT 3 हा स्मार्टफोन MWC २०२३ या शो मध्ये २८ फेब्रुवारी रोजी लॉन्च केला जाणार आहे.
ज्यांना कमीत कमी वेळेमध्ये आणि ज्यांच्याकडे वेळ फार कमी असतो त्यांच्यासाठी हा फोन खास तयार करण्यात आला आहे. Realme ने अलीकडेच Realme GT Neo 5 सुद्धा लॉन्च केला होता ज्याचा देखील चार्जिंग स्पीड समान आहे.