Realme ही एक चिनी कंपनी आहे. ही कंपनी मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आता सुद्धा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे. तर हा स्मार्टफोन कोणता आहे आणि याचे फीचर्स व किंमत किती आहे याबद्दल जाणून घेऊयात.
काय आहेत फीचर्स ?
रिअलमी कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme GT Neo 5 हा स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला असून याचे फीचर्स काय आहेत ते पाहुयात. रिअलमीच्या Realme GT Neo 5 या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये १६ जीबी रॅम आणि २५६ इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना वापरायला मिळणार आहे. तसेच यात २४० वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट येतो. GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ८, १२ आणि १६ जीबी रॅम येते व तीनही प्रकारांमध्ये २५६ जीबी स्टोरेज येते.
या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना आणखी काही फीचर्स मिळणार आहेत. जसे की यामध्ये ६.७४ इंचाची AMOLED स्क्रीन येते. यायचा रिफ्रेश रेट हा २७७२x १२४० पिक्सल इतका आहे. यामध्ये ४६००mAh क्षमतेची बॅटरी येते जी २४० वॅटच्या चार्जिंगला सपोर्ट करते. तंत्र १५० वॅटचे चार्जिंग सपोर्ट असणाऱ्या व्हेरिएंटची बॅटरी ५०००mAh क्षमतेची येते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार GT Neo 5 हा स्मार्टफोन २४० वॅटच्या चार्जिंग सपोर्टमुळे ८० सेकंदात २० टक्के चार्ज होतो. हा फोन ४ मिनिटांत ५० टक्के आणि १० मिनिटांच्यापेक्षा कमी वेळेत १०० टक्के चार्ज होतो. या स्मार्टफोनला कंपनीच्या VOOC आणि SuperVOOC या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट मिळतो.
हेही वाचा : Amazon वर सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय तब्बल १३ हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या
Realme GT Neo 5 स्मार्टफोनला ५० मेगापिक्सलचह प्रायमरी सेन्सर आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर असलेला कॅमेरा येतो. वापरकर्त्यांना सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. कंपनीच्या लॅबने सांगितले की हा फोन १० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम होत नाही.
Realme GT Neo 5 ची किंमत
Realme GT Neo 5 हा स्मार्टफोन ग्राहकांना व्हाईट, ब्लॅक आणि पर्पल या रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. २४० वॅटचे चार्जिंग सपोर्ट असणाऱ्या १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या फोनची ३,१९९ चिनी युआन (सुमारे ३९,००० रुपये) असणार आहे. तर १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ३,४९९ चिनी युआन (सुमारे ४२,६०० रुपये ) आहे.